Pune ACB Trap | 10 हजार रुपये लाच घेताना पुणे ग्रामीण पोलीस दलातील कर्मचारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – प्रतिबंधात्मक कारवाई न करण्यासाठी व गुन्ह्यात मदत करण्यासाठी 10 हजार रुपये लाच स्वीकारताना (Accepting Bribe) पुणे ग्रामीण पोलीस (Pune Rural Police) दलातील वालचंदनगर पोलीस ठाण्यातील (Walchandnagar Police Station) पोलीस हवालदाराला पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Pune ACB Trap) सापळा रचून रंगेहात पकडले. मोहन मल्हारी ठोंबरे (Police Constable Mohan Malhari Thombre) असे लाच घेताना पकडण्यात आलेल्या पोलिसाचे नाव आहे. पुणे एसीबीने (Pune ACB Trap) ही कारवाई शुक्रवारी (दि.27) वालचंदनगर पोलीस ठाण्यात केली.

 

याबाबत 34 वर्षीय व्यक्तीने पुणे एसीबीकडे (Pune ACB Trap) शुक्रवारी तक्रार केली आहे. तक्रारदार यांच्याविरुद्ध वालचंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल आहे. दाखल तक्रारीमध्ये प्रतिबंधात्मक कारवाई (Preventive Action) न करण्यासाठी तसेच गुन्ह्यात (Pune Crime News) मदत करण्यासाठी पोलीस हवालदार मोहन ठोंबरे यांनी दहा हजार रुपये लाचेची मागणी केली. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी पुणे एसीबीकडे तक्रार केली.

पुणे युनिटने पंचासमक्ष पडताळणी केली असता मोहन ठोंबरे यांनी प्रतिबंधात्मक कारवाई न
करण्यासाठी व मदत करण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे दहा हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.
पथकाने वालचंदनगर पोलीस ठाण्यात सापळा रचला. तक्रारदार यांच्याकडून लाचेची रक्कम घेताना मोहन ठोंबरे यांना रंगेहात पकडण्यात आले.
ठोंबरे यांच्यावर वालचंदनगर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (Prevention of Corruption Act) गुन्हा (FIR) दाखल केला आहे.
पुढील तपास पुणे युनिटचे पोलीस निरीक्षक प्रविण निंबाळकर (Police Inspector Pravin Nimbalkar) करत आहेत.

 

ही कारवाई पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे (SP Amol Tambe),
अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव (Addl SP Suraj Gurav)
यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली.

 

Web Title :- Pune ACB Trap | Employees of Pune Rural Police force caught in anti-corruption net while taking Rs 10 thousand bribe

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Jayant Patil | …काका कानाला बोटे लावा; काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस एकोप्यावर बोलताना जयंत पाटील यांचा संजय पाटील यांना टोला

Advay Hire | शिवसेनेच्या ठाकरे गटात प्रवेश करताच अद्वय हिरे यांचा भाजपवर जोरदार हल्लाबोल; म्हणाले…

CM Eknath Shinde | आगामी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला ४ ते ६ जागा राखता आल्या तरी पुरेसं – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे