Pune ACB Trap | 2 हजाराची लाच घेताना पुण्यातील पोलीस कर्मचारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune ACB Trap | अजामीनपात्र वॉरंटमध्ये (Non-Bailable Warrant) अटक न करण्यासाठी दोन हजार रुपये लाच स्विकारणाऱ्या (Accepting Bribe) लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील (Loni Kalbhor Police Station) पोलीस हवालदार आणि निलंबित होमगार्ड यांना पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Pune ACB Trap) सापळा रचून रंगेहात पकडले. पोलीस हवालदार मुकुंद शंकर रणमोडे Mukund Shankar Ranmode (वय-49) आणि गजेंद्र माणिक थोरात Gajendra Manik Thorat (वय 35) असे लाच घेताना पकडण्यात आलेल्या दोघांची नावे आहे. तर ही कारवाई बुधवारी (दि.31) पोलीस स्टेशन समोर करण्यात आली.

 

याबाबत 36 वर्षाच्या व्यक्तीने पुणे एसीबीकडे (Pune ACB Trap) तक्रार केली आहे. तक्रारदार यांच्या विरोधात न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. वॉरंटमध्ये अटक न करण्यासाठी पोलीस हवालदार मुकंद रणमोडे यांनी पाच हजार रुपये लाच मागितली. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी पुणे एसीबीकडे तक्रार केली.

 

प्राप्त तक्रारीची पडताळणी केली असता पोलीस हवालदार रणमोडे यांनी पाच हजार रुपये लाचेची मागणी करुन तडजोडीत अंती दोन हजार रुपये स्विकारण्याचे कबूल केले. तक्रारदार यांच्याकडून लाचेची रक्कम स्विकारताना पुणे एसीबीच्या (Anti Corruption Bureau (ACB) Pune) पथकाने मुकुंद रणमोडे आणि गजेंद्र थोरात यांना रंगेहात पकडले. त्यांच्यावर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (Prevention of Corruption Act) गुन्हा दाखल (FIR) करण्यात आला आहे.

 

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे (Pune ACB SP Rajesh Bansode),
अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव (Addl SP Suraj Gurav) यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे पथकाने केली.
पुढील तपास पोलीस उप अधीक्षक विजयमाला पवार (Deputy Superintendent of Police Vijayamala Pawar) करीत आहेत.

 

Web Title :- Pune ACB Trap | Pune ACB Trap on Police Havaldar Mukund Shankar Ranmode

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

विना आधार नंबर डाऊनलोड करा E-Aadhaar, फक्त करावे लागेल हे काम

 

Ganeshotsav 2022 | राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना 5 लाखांचा पुरस्कार, राज्य सरकारची घोषणा

 

Maharashtra Politics | शिंदे गटाकडून आदित्य ठाकरेंना धक्का देण्याची तयारी, श्रीकांत शिंदेंना मिळणार ‘ही’ जबाबदारी?