Pune Accident News | दुर्देवी ! टँकरची दुचाकीला धडक, भीषण अपघातात दोन चिमुकल्यांचा मृत्यू; पुण्यातील विश्रांतवाडी चौकातील घटना (Video)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Accident News | भरधाव वेगात जाणाऱ्या पेट्रोलच्या टँकरची धडक एका दुचाकीला बसली. या भीषण अपघातात दोन लहान मुलींचा मृत्यू झाला तर एक महिला गंभीर जखमी झाली आहे. हा अपघात सोमवारी (दि.16) दुपारी साडेचारच्या सुमारास विश्रांतवाडी चौकात झाला. याप्रकरणी टँकर चालकाला विश्रांतवाडी पोलिसांनी (Vishrantwadi Police Station) ताब्यात घेतल्याची माहिती येरवडा वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक शैलेश संखे (PI Shailesh Sankhe) यांनी दिली. (Pune Accident News)

साक्षी आणि श्रद्धा (वय- 3.5 वर्षे) असे मृत्यू झालेल्या दोन लहान मुलींची नावे आहेत. तर किरण सतीश कुमार झा (वय 38) या जखमी झाल्या आहेत. अपघात झाला त्यावेळी सतीशकुमार हरीनारायण झा (वय – 40 रा. सर्वे नं. 281/1 संत तुकाराम नगर, गोपाळ मंदिराजवळ, भोसरी. पुणे) हे गाडी चालवत होते. याप्रकरणी टँकर चालक प्रमोद कुमार यादव याला ताब्यात घेतले आहे. (Pune Accident News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विश्रांतवाडी चौकात एअरपोर्ट कडून भोसरीकडे जाताना सिग्नल चालू झाल्यावर
पेट्रोलच्या टँकरने (MH 03 CP 2228) टू व्हीलर ला (MH 14 DG 4948) धडक दिली आहे.
त्यामध्ये टु व्हीलर वरील दोन लहान मुली गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला. एक महिला जखमी झाली आहे.
अपघातात जखमी झालेल्यांना विश्रांतवाडी पोलीस ठाण्यातील मार्शल यांनी ससून हॉस्पिटल (Sassoon Hospital)
येथे उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारापूर्वी दोन लहान मुलींचा मृत्यू झाला आहे.
पोलिसांनी टँकर चालकाला ताब्यात घेतले असून टँकर जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Bhidewada Smarak Issue Solved | ‘भिडेवाडा स्मारका’चा प्रश्न निकाली! सुप्रीम कोर्टातील खटला
पुणे महापालिकेने जिंकला

Bhide Wada Smarak | ऐतिहासिक भिडे वाड्यातील ‘स्मारकाचा’ मार्ग मोकळा; भूसंपादनाशी निगडीत दीर्घ काळ प्रलंबित असलेल्या खटल्याचा निकाल महापालिकेच्या बाजूने

Meera Borwankar Explation On Ajit Pawar | ‘अजित पवारांनी लिलाव केला नाही, हे सत्य, पण…’, मीरा बोरवणकर यांनी दिले स्पष्टीकरण

Gopichand Padalkar On Sharad Pawar | गोपीचंद पडळकरांनी नाव न घेता पुन्हा शरद पवारांना डिवचले, म्हणाले…

Chiplun Flyover Bridge Broke | बांधकाम सुरू असताना उड्डाण पुलाचे गर्डर तुटले, मोठ्या आवाजामुळे नागरिकांची पळापळ

Pune Crime News | मंडपातील पांढऱ्या कपड्यावरुन उठण्यास सांगितल्याने तरुणावर वार, गंज पेठेतील घटना; सराईत गुन्हेगाराला अटक