Pune Accident News | स्कूल बसच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू, हडपसरमधील घटना; बसचालकाला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Accident News | भरधाव वेगात जाणाऱ्या स्कूल बसची धडक एका दुचाकीस्वाराला बसली. यामध्ये गंभीर जखमी होऊन दुचाकीवरील तरुणाचा मृत्यू झाला. हा अपघात (Pune Accident News) सोमवारी (दि.6) सकाळी साडे अकरा वाजता हडपसरमधील तुकाई दर्शन येथील चौरंग सोसायटीच्या गेटच्या समोर झाला. याप्रकरणी स्कूलबस चालकाला अटक केली आहे. (Pune Crime News)

ऋत्वीक अनील दुधाणे (वय-23) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर अजिंक्य प्रभाकर दाभाडे (वय-28 रा. देवाची ऊरळी, पुणे) याच्यावर आयपीसी 304 अ, 279 सह मोटार वाहन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. याबाबत संतोष तुकाराम दुधाणे (वय-38 रा. इशा एम्पायर, हांडेवाडी रोड, हडपसर) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद दिली आहे. (Pune Accident News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अजिंक्य दाभाडे हा स्कूलबसवर चालक म्हणून काम करतो.
सोमवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास मृत ऋत्वीक दुधाणे हा त्याच्या दुचाकीवरुन जात होता.
त्यावेळी आरोपी दाभाडे याने त्याच्या ताब्यात असलेली स्कूलबस हयगयीने भरधाव वेगात चालवली.
स्कूलबसची धडक ऋत्वीक याच्या दुचाकीला बसल्याने तो खाली पडला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपी स्कूलबस चालक दाभाडे याला अटक केली. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक खळदे (PSI Khalde) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

CM Eknath Shinde On Chhagan Bhujbal | CM शिंदेंनी स्पष्ट शब्दात भुजबळांना सुनावले, कुणीही संभ्रम पसरवायची आवश्यकता नाही, ‘सरकार…’

Pune Crime News | कार्ड इन्शूरन्स कॅन्सल करण्याच्या बहाण्याने महिलेची फसवणूक, हिंजवडीमधील प्रकार