Pune Accident News | पुणे – सोलापूर महामार्गावर भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, दोन तरुण ठार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – दुचाकीवरून हडपसर येथे आपल्या घरी निघालेल्या दोन तरूणांना भरधाव ट्रकने धडक दिल्याने दोघांचाही अपघातात (Pune Accident News) मृत्यू झाला. हा अपघात पुणे – सोलापूर महामार्गावर (Pune – Solapur Highway) लोणी काळभोर परिसरात काल मध्यरात्री घडला. अपघात (Pune Accident News) झाल्यानंतर फरार झालेल्या ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अपघातात मरण पावलेल्या युवकांची नावे गणेश विठ्ठल हवालदार (वय २६), आदित्य हरिदास साठे (वय २६, रा. दोघे रा. महादेवनगर, हडपसर) अशी आहेत. मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास गणेश आणि आदित्य हे दोघे दुचाकीने पुणे-सोलापूर महामार्गावरुन हडपसरकडे निघाले होते. कदमवाक वस्ती परिसरात भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले.

अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलीस (Pune Police) घटनास्थळी गेले असता दोघेही जखमी अवस्थेत
पडल्याचे दिसून आले. परंतु, उपचारापूर्वीच गणेश आणि आदित्यचा मृत्यू झाला.
अपघातानंतर फरार झालेल्या ट्रकचालकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध घेतला जात आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Police Commemoration Day | पोलीस स्मृती दिनानिमित्त पोलीस हुतात्मा स्मृती स्मारकाला अभिवादन

Uddhav Thackeray On Devendra Fadnavis | उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना जोरदार टोला, म्हणाले – ”हे म्हणजे बॉम्बस्फोटाच्यावेळी दाऊद भाजपाचा…”

Raj Thackeray On FSI In Pune | पुणे शहरात एफएसआयचा सुळसुळाट झालाय पण रस्ते कुठे आहेत? (Video)

EVM मध्ये गोंधळ करता येऊ शकतो; आयटीतज्ज्ञ माधव देशपांडे यांनी प्रात्यक्षिकासह दाखवले