Pune : आरोपींनी कुख्यात गुंड बापू नायरची ‘ससून’मध्ये घेतली भेट, त्यानंतर झाला होता युवा सेनेचे पदाधिकारी दिपक मारटकर यांचा खून, 6 पोलिस कर्मचार्‍यांच्या निलंबनानं प्रचंड खळबळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   पुण्यातील गाजलेल्या युवा सेनेचा पदाधिकारी दिपक मारटकर यांच्या खून प्रकरणात कुविख्यात गुंड बापू नायर याच्या सांगण्यावरून खून केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर आता याच प्रकरणात पुणे पोलीस दलातील 6 कर्मचाऱ्यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. बुधवारी निलंबनाचे आदेश देण्यात आले आहेत.

याप्रकरणात कोर्ट कंपनीमधील एक हवालदार आणि 5 कॉन्स्टेबलचा समावेश आहे. कॉन्स्टेबल 2016 बॅचचे आहेत. तर हवालदार हा रेल्वे पोलीस दलातून पुणे शहर पोलीस दलात बदलून आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, युवा सेनेचा पदाधिकारी दीपक मारटकर याचा 10 जणांनी कोयत्याने सपासप वारकरून निर्घृण खून केला होता. काही दिवसांत पुणे पोलिसांनी याप्रकरणी दहा जणांना अटक केली. त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर कुविख्यात गुंड बापू नायर याच्या सांगण्यावरून खून झाल्याचे समोर आले होते. या खुनातील आरोपी हे बापू नायर याला ससून रुग्णालयात भेटल्याचे समोर आले होते. बापू नायर सध्या कारागृहात आहे. उपचारासाठी तो ससून रुग्णालयात आला होता. त्यावेळी या आरोपींनी त्याची भेट घेतली होती. त्यानंतर हे खुनाचा प्रकार घडला.

दरम्यान, बापू नायरला कोर्ट कंपनीच्या कर्मचारी यांचे बंदोबस्त होता. दोन ते तीन दिवस हा बंदोबस्त होता. पोलिसांचा बंदोबस्त असताना आरोपी नायरला कसे भेटले, असा प्रश्न या निमित्ताने समोर आला. अधिकार्‍यांनी त्याची चौकशी केली. त्यात हे सर्वजण त्या कालावधीत ड्युटीवर असल्याचे समोर आले. त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कामात कुचराई करत त्यांनी पोलीस दलाची प्रतिमा मलिन केल्याचा ठपका ठेवत त्यांना निंलबीत केले आहे.

You might also like