Pune Airport Terminal Inauguration | पुणे विमानतळ नवे टर्मिनल उद्घाटन: ऑनलाईन उद्घाटन आधीच का केले नाही? – मोहन जोशी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Airport Terminal Inauguration | पुणे विमानतळाच्या नव्या टर्मिनलचे उद्घाटन अखेरीस १० मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑनलाईन पद्धतीने करणार आहेत हे ऐकल्यावर मनात येते की, ऑनलाईन पद्धतीनेच पंतप्रधान नरेंद्र मोदींना उद्घाटन करायचे होते तर ते आधीच का केले नाही? प्रवाशांची या नव्या टर्मिनलमुळे फार मोठी सोय होणार होती हे माहीत असूनही विमान प्रवास करणाऱ्या पुणेकरांची कुचंबणा करीत या नव्या टर्मिनलचे उद्घाटन इतके दिवस होऊ दिले नाही. या भाजपाच्या कृतीमुळे पुणेकरांमध्ये संताप उसळणे स्वाभाविक आहे असे महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष व माजी आमदार मोहन जोशी (Congress Leader Mohan Joshi) यांनी म्हटले आहे.(Pune Airport Terminal Inauguration)

मोहन जोशी पुढे म्हणाले की, पुणे शहर कॉंग्रेस पक्ष आणि ‘वेक अप पुणेकर’ यांच्यामार्फत गेले अनेक महिने रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी मेट्रो आणि पुणे विमानतळ नव्या टर्मिनलचे लोकार्पण लगेच व्हावे यासाठी आम्ही आवाज उठवला, आंदोलने केली, घंटानाद केले. त्यामुळेच मेट्रो मार्गाचे उद्घाटन ऑनलाईन पद्धतीने नुकतेच केले गेले आणि आता नव्या टर्मिनलचे लोकार्पणदेखील पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑनलाईन पद्धतीने करणार आहेत. जनआंदोलनाचे हे सारे श्रेय आहे, असे ते म्हणाले.

वास्तविक पंतप्रधान नरेंद्र मोदींना वेळ नाही हे लक्षात घेता मेट्रोसाठी रेल्वेमंत्री आणि टर्मिनलसाठी हवाई वाहतूकमंत्री यांच्या हस्ते लोकार्पण करता आले असते. असे सांगून मोहन जोशी म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा त्यांच्या पक्षात दराराच एवढा मोठा आहे की, पुणे भाजपला रेल्वेमंत्री अथवा हवाई वाहतूकमंत्री हा पर्याय सुचवण्याचे धारिष्ट्य झाले नाही, हे देखील यातून दिसून येते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Devendra Fadnavis On Sharad Pawar | देवेंद्र फडणवीसांची शरद पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावर प्रतिक्रिया,
”इतक्या ज्येष्ठ नेत्याने आमदारांना धमकी देणे योग्य नाही”

Kapil Sibal In Supreme Court | ”शिवसेना आमदार अपात्रताप्रकरणी लवकर निर्णय द्या, कारण…”, कपिल सिब्बल यांचा SC मध्ये युक्तिवाद

Pune News | पुणे जिल्हयातील हॉटेल, बार, परमिट रूम, रेस्टॉरंट रात्री 12.30 ला बंद करा, निवासी उपजिल्हाधिकार्‍यांचा आदेश

सन 2024- 25 या वर्षीचे पुणे महापालिकेचे 11 हजार 601 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक मंजूर;
समाविष्ट गावांतील विकासासाठी 550 कोटी रूपयांची भरवी तरतूद

जिल्ह्यात अवैध धंदे रोखण्यासाठी धडक कारवाई करा – जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे

पथारी व्यावसायीकांना देण्यात आलेल्या ‘फेरीवाला प्रमाणपत्रा’ची विक्री बेकायदेशीर

Prakash Ambedkar On Maha Vikas Aghadi Meeting | मविआची बैठक सकारात्मक, प्रकाश आंबेडकरांच्या चेहऱ्यावर हास्य! पुढील बैठकीत जागावाटपाचा अंतिम निर्णय