Pune Anti Corruption | 70 हजाराच्या लाचेची मागणी करणाऱ्या तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यासह खासगी इसमावर FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  Pune Anti Corruption | वडिलांच्या नावे असलेल्या जमिनीच्या सपाटीकरणासाठी तहसीलदार यांची परवानगी मिळवून देण्यासाठी खासगी व्यक्ती संजय महादेव जाधव Sanjay Mahadev Jadhav (वय-28) याने तक्रारदार यांच्याकडे 70 हजाराची लाच (Demand bribe) मागितली. तर तहसील कार्यालयातील अव्वल कारकून (clerk) बालाजी सुधाकर चिद्दरवार Balaji Sudhakar Chiddarwar (वय-50) याने लाचेची रक्कम स्विकरण्यास प्रोत्साहन दिले. याप्रकरणी दोघांवर स्वारगेट पोलीस ठाण्यात (Swargate Police Station) लाचलुचपत प्रतिबंधक (Pune Anti Corruption) कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी 28 वर्षाच्या तरुणाने पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (Pune Anti Corruption) तक्रार केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांना त्यांच्या वडिलांच्या नावे असलेल्या जमिनीच्या सपाटीकरणासाठी हवेली तहसीलदार (Haveli Tehsildar) यांची परवानगी पाहिजे होती.
तहसीलदारांची परवानगी मिळवून देतो असे सांगून संजय जाधव याने तक्रारदार यांच्याकडे 70 हजार रुपयांची लाच मागितली.

तक्रारदार यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर पथकाने पंचासमक्ष 26 मार्च ते 26 मे 2021 या कालावधीत पडताळणी केली.
खासगी इसम संजय जाधव याने तक्रारदार यांच्याकडे 70 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.
तर तहसील कार्यालयातील अव्वल कारकून बालाजी चिद्दरवार यांनी खासगी व्यक्ती संजय जाधव याला लाच मागण्यात प्रोत्साहित केल्याचे तपासात समोर आले.
त्यानुसार दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक सुनिल क्षीरसागर (Police Inspector Sunil Kshirsagar) करीत आहेत.

 

Web Title : Pune Anti Corruption | FIR against a private Isma with a tehsil office employee demanding a bribe of Rs 70,000

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Essential Tests For Women | 30 वर्षानंतर महिलांनी अवश्य केल्या पाहिजेत ‘या’ 5 टेस्ट; जाणून घ्या

Pune Navratri 2021 | पुण्यात नवरात्रोत्सवात दांडीया, गरबा आणि मिरवणुकीला परवानगी नाही; पालिका आयुक्तांचे आदेश

HeartBurn | छातीत जळजळीच्या 8 लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष, कॅन्सर-हार्ट अटॅकचे असू शकतात संकेत, जाणून घ्या