Pune : गुन्हे शाखेतील सामाजिक सुरक्षा विभागात आणि युनिट-4 मध्ये पोलिस निरीक्षकांची नेमणुक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – आयुक्तालयातील पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या झाल्यानंतर आता राहिलेल्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. गुन्हे शाखेत 2 पोलिस निरीक्षकांची पदस्थापना करण्यात आल्या आहे. सामाजिक सुरक्षा विभाग आणि युनिट- 4 येथे पोलिस निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सध्या गुन्हे शाखेतील प्रशासन विभागाच्या पोलिस निरीक्षक असलेल्या अनघा देशपांडे यांची तात्पुरती नेमणुक सामाजिक सुरक्षा विभागात करण्यात आली आहे. तर आयुक्तालयात नव्याने हजर झालेले पोलिस निरीक्षक रजनिश निर्मल यांची गुन्हे शाखेच्या युनिट-4 येथे नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नेमणुकीचे आदेश पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मान्यतेने गुन्हे शाखेचे उपायुक्त बच्चन सिंह यांनी आज (मंगळवार) काढले आहेत.