पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावरील HDFC चं ATM चोरट्यांनी नेले पळवून

वाघोली : पोलीसनामा ऑनलाइन (कल्याण साबळे पाटील) – लोणीकंद पोलिस स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर असणार्‍या एचडीएफसी बँकेचे एटीएम चोरट्यांनी (दि.16) सोमवारी सकाळी चार ते पाच च्या दरम्यान पळवल्याची घटना समोर आली असून त्यामध्ये एकूण अंदाजे पाच लाख नव्वद हजार रुपये असल्याची माहिती समोर आली आहे.

पोलिसांना चॅलेंज देऊनच चोरट्यांनी एटीएम मशीन पळवली आहे का ? असा प्रश्न सर्व सामान्यांना पडला आहे. पोलीस अधीक्षकांचे आदेश असूनही पोलीस कुठे कमी पडले अशी चर्चा नागरिकांमध्ये रंगू लागली आहे.

पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी दोनच दिवसापूर्वी पुणे-नगर रोड आणि पुणे-सोलापूर रोड वरती रात्री गस्त वाढवण्याचे आदेश दिले होते. असे असतानाही लगेच पुणे-नगर रोडवरील शिक्रापुर आणि लोणीकंद पोलिस स्टेशन हद्दीमध्ये एटीएमच चोरी झाल्याने पुणे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. लोणीकंद पोलिसांच्या वतीने आणि गुन्हे अन्वेषण शाखेच्या वतीने वेगवेगळे पथक तयार करून चोरट्यांचा शोध सुरु आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like