येरवड्यात कोयतेधारी टोळक्याचा राडा, तरुणाच्या खुनाचा प्रयत्न

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोयते हातात घेऊन आलेल्या टोळक्याने राडा घालत विनाकारण तरुणावर हल्ला करून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना येरवडा परिसरात घडली. पोलिसांनी चौघांना पकडले आहे.

महेश सुभाष निगडे (रा. लोहगाव) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत गणेश निगडे (वय 35) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विशाल बानेकर (वय 23), अनिकेत कसबे (21), प्रफुल्ल कसबे (वय 20) व अजय कसबे(19) यांना पकडण्यात आले आहे. तर त्यांचे साथीदार पसार झाले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा भाऊ दोन दिवसांपूर्वी येथील बिडी कामगार वसाहत येथील देवीच्या मंदिरात जवळ थांबला होता. यावेळी आरोपी हे त्याठिकाणी हातात कोयते घेऊन तसेच संचारबंदीचे उल्लंघन करत तोंडाला मास्क न लावता आले. त्यांनी गोंधळ घालत विनाकारण महेश याच्यावर सपासप वार केले. तसेच त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. अधिक तपास येरवडा पोलीस करत आहेत.