पुणे : वडारवाडीत जुन्या वादातून तरूणावर कोयत्याने वार, दोघे अटकेत

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – पूर्ववैमनस्यातून तरूणावर कोयत्याने सपासप वार केल्याची घटना चतुःशृंगी परिसरात घडली. पोलिसांनी दोघांना पकडले आहे. मंगळवारी सायंकाळी ही घटना घडली आहे.

गणेश अनिल कोकणे (वय १९) आणि प्रफुुल्ल विजय गायकवाड (वय १९, दोघेही रा. जुनी वडारवाडी ) अशी अटक केेलेल्यांची नावे आहेत. सागर पवार (वय २३ रा. वडारवाडी) हा जखमी झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर, प्रफुुल्ल आणि गणेश वडारवाडीत राहायला आहेेेत. एकमेकांच्या ओळखीचे आहेत. काही दिवसांपुवी सागर आणि गणेशमध्ये किरकोळ कारणावरुन वाद झाला होता. त्याचा राग मनामध्ये धरुन संध्याकाळी सहाच्या सुमारास गणेश आणि प्रफुुल्लने सागरवर कोयत्याने वार करुन जखमी केले. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे करीत आहेत.