Pune : किरकोळ कारणावरून मित्रावर तीक्ष्ण हत्याराने सपासप वार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   किरकोळ कारणावरून मित्राला दारू पिण्यास नेहून तीन गुन्हेगारांनी बेदम मारहाण करत तीक्ष्ण हत्याराने सपासप वार केल्याचा प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी प्रेम उर्फ टाकल्या प्रताप परदेशी (वय 25), ओंकार उर्फ पप्पु शंकर जोशी (वय 19) व अक्षय उर्फ गोट्या रामदास लोळे (वय 22,रा. पर्वती दर्शन) अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. याबाबत स्वारगेट पोलिस ठाण्यात शभूम रोकड (वय 22) याने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी मित्र आहेत. दरम्यान दोन दिवसांपूर्वी फिर्यादी याचे ओंकार जोशी सोबत वाद झाले होते. यानंतर हे वाद मिटले. त्यानंतर त्यांनी फिर्यादी तरुणाला दारू पिण्यास जोशी याने त्याच्या घरी बोलावले. दरी पिल्यानंतर ते गुटखा खाण्यासाठी म्हणून स्वारगेट परिसरात आले. यावेळी फिर्यादीला तू काल आमच्यासोबत भांडण का केले म्हणून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तसेच तीक्ष्ण हत्याराने त्याच्यावर सपासप वारकरून त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. तर त्याला तिथेच ढकलून देऊन पसार झाले. माहिती मिळताच स्वारगेट पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

दरम्यान तिघे पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. अधिक तपास स्वारगेट पोलीस करत आहेत.