पुणे : हडपसरमध्ये विरोधकांसोबत फिरत असल्यानं तरूणावर कोयत्यानं सपासप वार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – विरोधक असणार्‍या तरुणासोबत फिरत असल्याच्या रागातून चौघांनी दुकानात शिरून कोयत्याने वार करत तुफान गोंधळ घातल्याची घटना समोर आली आहे. हडपसर परिसरात ही घटना घडली आहे.

याप्रकरणी ऋषिकेश पिंगळे (वय 23, रा. गोंधळेनगर) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, चौघाजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सातववाडी परिसरातील गणेश हेअर कटींग सलूनमध्ये काम करतो. दरम्यान, आरोपी व फिर्यादी तरूणाची तोंडओळख आहे. दरम्यान, तो तेजस गोंधळे सोबत फिरत होता. याचा राग आरोपींच्या मनात होता. यावरून आरोपी शनिवारी दुपारी फिर्यादीच्या दुकानात आले. तसेच, त्याला शिवीगाळ करून याठिकाणी गोंधळ घातला. तसेच, त्याच्यावर कोयत्याने सपासप वार केले. फिर्यादीचे दुकान मालक व इतर कामगारांनी याला विरोध केला असता त्यांना धमकावत शिवागीळ केली. अधिक तपास हडपसर पोलीस करत आहेत.

 

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

You might also like