पुर्ववैमन्यासातून तरूणावर कोयत्याने सपासप वार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुर्ववैमन्यासातून सराईत गुन्हेगार व त्याच्या साथीदाराने तरूणावर कोयत्याने सपासप वारकरून त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना कात्रज परिसरात घडली. पोलिसांनी एकाला अटक केली आहे. ऋषिकेश बरडे (वय 20, रा. संतोषनगर, कात्रज) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. यात इशान शेख (वय 21, रा. कात्रज) हा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत त्याचा भाऊ फरहद शेख याने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋषिकेश बरडे हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, त्याच्यावर यापुर्वी भादवी कलम 324, 326, आर्म अ‍ॅक्ट नुसार गुन्हा दाखल आहे. आरोपी व फिर्यादीं एकमेकांना ओळखतात. तसेच, त्यांच्यात यापुर्वी किरकोळ कारणावरून वाद देखील झाले होते. याचा राग आरोपीच्या मनात होता. दरम्यान, रविवारी दुपारी फिर्यादीचा भाऊ इशान हा राहत्या परिसरात थांबला होता.

त्यावेळी आरोपी साथीदारासोबत तेथे आला. तसेच, त्याच्याशी वाद घालत त्याला हाताने मारहाण केली. त्यानंतर कोयत्याने सपासप वारकरून तेथून पसार झाले. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गुन्हा दाखल करत ऋषीकेशला अटक केली. अधिक तपास उपनिरीक्षक मचाले हे करत आहेत.

You might also like