काय सांगता ! होय, पुण्यात चक्क बँक मॅनेजर अन् IT इंजिनिअर चालवायचे सेक्स रॅकेट, पाषाणमध्ये पोलिसांकडून पर्दाफाश

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  एका बँकेच्या सहाय्यक व्यवस्थापक आणि संगणक अभियंत्यासह चौघांनी पुण्यात इस्कॉर्टच्या माध्यमातून सेक्स रॅकेट चालविल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चतुःश्रुगी भागात एका बड्या हॉटेलमध्ये हे सेक्स रॅकेट चालत होते. त्यावर धाड टाकून चतुःश्रुगी पोलिसांनी त्याचा पर्दाफाश केला आहे. स्वीट सर्व्हीसेस इस्कॉर्ट नावाने ते सेक्स रॅकेट चालवत होते. त्यांच्या ताब्यातून चार मुलींची सुटका करण्यात आली आहे.

सुरेश प्रल्हाद रणवीर (वय 35, रा. बाणेर, मूळ. नांदेड), नाकसेन रामदास गाजघाटे (वय 52, बावधन), रविकांत बालेश्वर पासवान (वय 34, रा. सुस, मूळ. बिहार) आणि दीपक जयप्रकाश शर्मा (वय 36, रा. बालेवाडी, मूळ ओडिसा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी चतुःश्रुगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

pashan-sex-racket

रविकांत पासवान हा बँकेचा सहाय्यक व्यवस्थापक आहे. तो बारामती तालुक्यातील मुरूम येथील बँक ऑफ बडोदा येथे नोकरीस आहे. तर शर्मा हा संगणक अभियंता आहे. हॉटेलचा मालक नाकसेन आहे.
दरम्यान शहरात अवैध धंद्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. त्यानुसार पोलीस माहिती काढून कारवाई करत आहेत. दरम्यान काही दिवसांपूर्वी पोलिसांनी पाषाण टेकडीलगत असणाऱ्या “ओयो” हॉटेलवर छापा टाकून तेथील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला होता. त्यावेळी चालक आणि मालक या दोघांना पकडण्यात आले होते. त्यानंतर या गुन्ह्याचा बारकाईने तपास करत असताना पोलिसांना यात बड्या हस्ती असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार या गुन्ह्याचा तपास करण्यात आला. त्यावेळी या चौघांची नावे समोर आली. त्यानुसार पोलिसांनी या चौघांना अटक केली. त्यावेळी आरोपी हे स्वीट सर्व्हीसेस इस्कॉर्ट नावाने सेक्स रॅकेट चालवत असल्याचे समोर आले. त्यांच्या ताब्यातून 4 मुलींची सुटका करण्यात आली आहे. तसेच 11 मोबाईल, 4 लॉपटॉप, कार आणि इतर ऐवज जप्त करण्यात आला आहे. दरम्यान या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केल्यानंतर मोठ्या प्रमाणात खळबळ माजली आहे. प्रथमच एका बँक अधिकाऱ्याला सेक्स रॅकेटमध्ये पकडण्यात आले आहे. त्यामुळे सर्वच आवक झाले आहेत.

ही कारवाई परिमंडळ चारचे उपायुक्त पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक अनिल शेवाळे, उपनिरीक्षक मोहन जाधव, कर्मचारी संतोष जाधव, प्रकाश आव्हाड, तेजस चोपडे, ज्ञानेश्वर मुळे, एकनाथ जोशी, सार्थ साळवी, आशिष निमसे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.