Pune BJP | राष्ट्रवादीच्या ‘स्वराज्यरक्षक’ स्टीकर नंतर भाजपने लावले ‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय’ आशयाचे स्टीकर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरुन अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर टीका-टीप्पणी झाली. तसेच काही ठिकाणी आंदोलन झाली. या पार्श्वभूमीवर अजित पवार आज पुण्यात पहिल्यांदाच आले. यावेळी त्यांचे जंगी स्वागत केले. तसेच त्यांच्या हस्ते ‘स्वराज्यरक्षक संभाजी महाराज’ या नावाच्या स्टीकरचे प्रकाशन करण्यात आले. यानंतर पुण्यातील भाजपच्या (Pune BJP) कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली. भाजप (Pune BJP) कार्यकर्त्यांनी ‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय’ या अशयाचे स्टीकर दुचाकींना लावून राष्ट्रवादीचा (NCP) निषेध केला.

राष्ट्रवादीने सकाळी स्टीकर्सचे प्रकाशन केल्यानंतर संध्याकाळी पुणे भाजप (Pune BJP) शहर कार्यालयाबाहेर शहराध्यक्ष जगदीश मुळीक (Jagdish Mulik) यांच्या नेतृत्वाखाली अजित पवारांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. यावेळी दुचाकी आणि रिक्षावर ‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय’ या आशयाचे स्टीकर लावून निषेध नोंदविला. यावरुन भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये स्टीकर वॉर सुरु झाल्याचे पाहायला मिळत आहे. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

 

यावेळी भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक म्हणाले,
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी देखील आजपर्य़ंत अनेक वादग्रस्त विधान केली आहेत.
त्यानंतर आता महापुरुषांबद्दल वादग्रस्त विधान केले आहे.
त्यांनी काही म्हणू छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर होते आणि कायम राहतील,
अशी भूमिका त्यांनी मांडली. यावेळी मुळीक यांनी अजित पवारांनी राज्यातील जनतेची माफी मागावी अशी मागणी केली.

 

Web Title :- Pune BJP | bjp workers put stickers of dharmaveer chhatrapati sambhaji maharaj on bikes in pune

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

MP Sanjay Raut | ‘भाजपच्या लोकांना छत्रपती शिवाजी महाराजांविषयी कधीच प्रेम नव्हत’, संजय राऊतांचा भाजपवर घणाघात

Chhagan Bhujbal | ‘माझा डोळा विरोधी पक्ष पदावर नाही तर…’, बावनकुळेंच्या टीकेला छगन भुजबळांचे प्रत्युत्तर

Pune Crime News | पुण्यात कोयते उगारून दहशत निर्माण करणार्‍यांवर कठोर कारवाई – पोलिस आयुक्त रितेश कुमार (Video)