पुण्यात बनावट कागदपत्रांव्दारे 86 लाखांची फसवणूक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  जागा मालकाचे नाव धारण करुन बनावट कागदपत्रांद्वारे साडेतीन गुठ्यांचा व्यवहार करुन तरुणाची ८६ लाख १५ हजारांची फसवणूक करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडला. ही घटना धानोरीत घडली आहे.

याप्रकरणी शंकरलाल चौधरी (वय ३८, रा. लोहगाव रस्ता, धानोरी) यांनी विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका महिलेसह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शंकरलाल यांना धानोरीत जमीन घ्यायची होती. त्यावेळी एकाने साडेतीन गुंठे जागा असलेल्या मूळमालक जमुनाप्रसाद तिवारी यांचे नाव धारण केले. त्या नावाची बनावट कागदपत्रे तयार करुन चोरट्याने शंकरलाल यांना जागेचा मालक असल्याचे भासविले. त्यानंतर शंकरलाल यांनी व्यवहार करुन ८६ लाख १५ हजार रुपये जमुनाप्रसाद नाव धारण केलेल्या चोरट्याला दिले. त्यानंतर काहीदिवसांनी जमिनीचे मूळमालक जमुनाप्रसाद त्याठिकाणी आले. त्यांनी शंकरलाल यांना जागेवर बांधकाम का करता, अशी विचारणा केली. त्यानंतर फसवणूक झाल्याचे शंकरलाल यांच्या लक्षात आले. अधिक तपास सहायक निरीक्षक एस. एम. निकम करीत आहेत.