रविवार पेठेतील सराफी व्यापार्‍याला 11 लाखांचा गंडा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – रविवार पेठेतील एका सराफी व्यावसायिकाला सोन्याचे दागिने बनविणार्‍या कारागिरांनी 11 लाख रुपयांना गंडा घातल्याची घटना समोर आली आहे. गेल्याच आठवड्यात एका सराफी व्यावसायिकाला अशाच प्रकारे फसविण्यात आले होते. याप्रकरणी अल्लाराखा शेख (वय 46, रा. नाना पेठ) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 8 मार्च 2019 ते जानेवारी 2020 या कालावधीत हा प्रकार घडाल आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादींचे रविवार पेठेत सराफी दुकान आहे. ते ग्राहकांनी सोने घेऊन त्यांनी मागणी केल्याप्रकरणे दागिन्यांंचे डिझाईन बनवून देतात. दरम्यान, आरोपी कारागिर हे मुळचे परराज्यातील आहेत. त्यांच्याकडे फिर्यादी हे ग्राहकांनी सांगितल्याप्रमाणे डिझाईन बनविण्यासाठी आरोपींकडे देत असत. अनोळख असल्याने फिर्यादींचा त्यांच्यावर विश्वास बसला होता.

फिर्यादींनी त्यांना 11 लाख 10 हजार रुपयांचे एकूण 300 ग्रॅम सोने दिले होते. परंतु, आरोपींनी डिझाईन किंवा सोने परत न करता त्यांची फसवणूक केली आहे. कारागिर पसार झाल्यानंतर त्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. अधिक तपास फरासखाना पोलीस करत आहेत.

You might also like