Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 215 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन पुणे शहरामध्ये (Pune Corona) कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मागील काही दिवसांपासून नवीन रुग्णांच्या तुलनेत बरे होण्याऱ्या रुग्णांचे (Recover Patient) प्रमाण जास्त होते. परंतु आज पुण्यातील कोरोना बाधित (Pune Corona) रुग्णांची संख्या अधिक असून आज दोनशेच्यावर रुग्ण आढळून आले आहेत. पुणे शहरामध्ये गेल्या 24 तासात 215 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 161 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

पुणे शहरात आजपर्यंत 4 लाख 98 हजार 882 इतके कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे.
त्यापैकी 4 लाख 87 हजार 984 इतके रुग्ण बरे झाले आहेत.
पुण्यात गेल्या 24 तासात 06 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील 04 तर पुणे महापालिका (Pune Municipal Corporation) हद्दीबाहेरील 02 रुग्णांचा समावेश आहे.
आतापर्यंत पुणे शहरात 8990 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

शहरात 1908 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण

आज दिवसभरात शहरातील खासगी आणि शासकीय स्वॅब तपासणी केंद्रावर 9420 स्वॅब तपासणी करण्यात आली आहे. आतापर्यंत पुण्यामध्ये 32 लाख 62 हजार 137 प्रयोगशाळा चाचण्या करण्यात आल्या आहेत. शहरामध्ये सध्या 1908 रुग्ण अ‍ॅक्टिव्ह (active patient) आहेत.
त्यापैकी 188 रुग्ण गंभीर आहेत. तर 161 रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

 

पुणे जिल्ह्यातील रिकव्हरी रेट 97.68 %

पुणे जिल्ह्यातील (Pune district) कोरोना बाधीत एकूण 11 लाख 28 हजार 462 रुग्णांपैकी 11 लाख 2 हजार 247 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टिव्ह रुग्ण 7 हजार 504 आहे.
कोरोनाबाधित एकूण 18 हजार 711 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
मृत्यूचे प्रमाण 1.66 टक्के इतके आहे तर बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 97.68 टक्के आहे.

Web Title : Pune Corona |215 new corona patients in Pune city in last 24 hours, find out other statistics

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

भारतात YouTube च्या व्ह्यूअर्समध्ये वाढ, मागील वर्षापासून 45% पेक्षा जास्त लोकांनी टीव्हीवर पाहिले यूट्यूब

PMC Medical College | नॅशनल मेडिकल कमिशनकडून (NMC) पुणे मनपाच्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाला परवानगी

Pradhan Mantri Kusum Yojana | ‘प्रधानमंत्री कुसुम योजना’ शेतकऱ्यांसाठी महत्वाची; जाणून घ्या