Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 225 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहरामध्ये कोरोनाचा (Pune Corona) प्रादुर्भाव कमी होत. आज (बुधवार) पुणे शहरातील नवीन रुग्णांची संख्या घटली आहे. तर अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची (active patient) संख्या दोन हजाराच्या आत आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या 24 तासात पुणे शहरामध्ये कोरोनाचे (Pune Corona) 199 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 225 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात (Discharge) आले आहे.

पुणे शहरात आजपर्यंत 4 लाख 98 हजार 667 इतके कोरोना बाधित रुग्ण (Corona-infected patients) आढळून आले आहे. त्यापैकी 4 लाख 87 हजार 823 इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 08 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील 03 तर पुणे महापालिका हद्दीबाहेरील 05 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 8986 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

पुण्यात 1858 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण
पुणे शहरामध्ये सध्या 1858 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये 188 रुग्ण गंभीर आहेत.
तर 271 रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत. आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 7973 स्वॅब तपासणी करण्यात आली आहे.
आतापर्यंत 32 लाख 52 हजार 717 तपासणी करण्यात आल्या आहेत.
अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. (Health Department of Pune Municipal Corporation)

Web Titel :- Pune Corona | 225 corona patients discharged in Pune city in last 24 hours, find out other statistics

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Gold Price Today | लागोपाठ 6 व्या दिवशी स्वस्त झालं सोनं, आता 27718 रुपयात मिळतंय 10 ग्रॅम, जाणून घ्या नवीन दर

23 वर्षीय शेजारीण माझ्या पतीला ‘अंडरगारमेंट्स’ दाखवते, 42 वर्षीय महिलेने पोलिसांकडे ‘ही’ मागणी; अधिकारी हैराण

Gauhati High Court | उच्च न्यायालयाचा निर्णय ! ‘मुस्लिम व्यक्तीनं हिंदू स्त्रीसोबत केलेला दुसरा विवाह अवैध’