Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 97 नवीन रुग्ण; जाणून घ्या इतर आकडेवारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहरात कोरोनाचा (Pune Corona) प्रादुर्भाव कमी होत आहे. शहरामध्ये नवीन रुग्ण आणि बरे होणाऱ्या रुग्णांमध्ये चढ-उतार पहायला मिळत आहे. रविवारी पुणे शहरातील विविध तपासणी केंद्रावर 3 हजार 926 संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 97 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर 90 रुग्णांनी कोरोनावर (Pune Corona) यशस्वी मात केली असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात (Discharge) आले आहे.

 

पुणे महानगर पालिकेच्या (Pune Corporation) आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी चार वाजेपर्यंत शहरामध्ये 97 रुग्णांचे निदान (Pune Corona) झाले आहे. त्यामुळे शहरातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 5 लाख 06 हजार 570 इतकी झाली आहे. तर आज दिवसभरात 90 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजपर्यंत 4 लाख 96 हजार 615 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. शहरात सध्या 852 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण (Active patient) असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

 

शहरात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या एकूण 36 कोटी 77 लाख 276 प्रयोगशाळा तपासणीमध्ये 5 लाख 6 हजार 570 पुणेकरांना कोरोनाची लागण (Corona infection) झाली आहे.
सध्या शहरामध्ये 95 रुग्ण गंभीर आहेत. तर 62 रुग्ण ऑक्सिजनसह उपचार घेत आहेत.
गेल्या 24 तासात शहराबाहेरील 3 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शहरात आजपर्यंत 9103 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

 

Web Title :- Pune Corona | 97 new corona patients in Pune city in last 24 hours; Learn other statistics

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Best Retirement Plans | ‘लाईफ इन्श्युरन्स’ पासून बचतीसह सुरक्षासुद्धा, तयार करा निवृत्तीचा प्लान; जाणून घ्या

केवळ 2 लाखात झीरो डाऊन पेमेंट लोनवर ‘ही’ कंपनी देईल Renault KWID, सोबत मिळेल गॅरंटी-वॉरंटी प्लान

Unique Digital Address Code | लवकरच घराचा पत्ता म्हणून वापरता येईल QR कोड, जाणून घ्या ‘स्कीम’