Pune Corona | दिवाळीनंतर पुण्यात ‘कोरोना’ रुग्णांचे पुन्हा शतक, गेल्या 24 तासात 113 नवीन रुग्ण; जाणून घ्या इतर आकडेवारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  – पुणे शहरामध्ये (Pune Corona) कोरोना बाधित रुग्णांच्या (Corona-infected patients) संख्येत मागील काही दिवसांपासून नवीन रुग्णांच्या तुलनेत बरे होण्याऱ्या रुग्णांचे (Recover Patient) प्रमाण जास्त होते. परंतु आज पुण्यातील कोरोना बाधित (Pune Corona) रुग्णांची संख्या अधिक असून आज शंभरच्या वर रुग्ण आढळून आले आहेत. पुणे शहरामध्ये गेल्या 24 तासात 113 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 59 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

 

पुणे शहरात आजपर्यंत 5 लाख 04 हजार 919 इतके कोरोना बाधित (Pune Corona) रुग्ण आढळून आले आहे. त्यापैकी 4 लाख 95 हजार 141 इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 04 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. हे रुग्ण पुणे महापालिका (Pune Municipal Corporation) हद्दीबाहेरील आहेत. आतापर्यंत पुणे शहरात 9077 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

 

शहरात 701 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण

 

आज दिवसभरात शहरातील खासगी आणि शासकीय स्वॅब तपासणी केंद्रावर 5054 स्वॅब तपासणी करण्यात आली आहे. आतापर्यंत पुण्यामध्ये 35 लाख 90 हजार 799 प्रयोगशाळा चाचण्या करण्यात आल्या आहेत. शहरामध्ये सध्या 701 रुग्ण अ‍ॅक्टिव्ह (active patient) आहेत. त्यापैकी 114 रुग्ण गंभीर आहेत. तर 81 रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

 

Web Title : Pune Corona: Century of ‘Corona’ patients in Pune again after Diwali, 113 new patients in last 24 hours; Learn other statistics

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Nawab Malik | ”आ रहा हूँ मै..’,’ फडणवीसांनी केलेल्या गंभीर आरोपांवरुन नवाब मलिकांचं उत्तर (व्हिडीओ)

Shiv Sena MP Vinayak Raut | ‘राणेंसारख्या गद्दाराची सिंधुदुर्गात डाळ शिजणार नाही’ – विनायक राऊत (व्हिडीओ)

Earn Money | दररोज होईल 4,000 ते 5,000 रुपयांची कमाई, सुरू करा ‘हा’ बिझनेस; जाणून घ्या काय आहे प्रोसेस?