
Pune Crime | पुणे पोलिसांना गुंगारा देणार्या गुंडाला कोल्हापूरात अटक; क्रिकेटच्या सामन्यात वेशांतर करुन मख्खनसिंह अजितसिंग कल्याणीला पोलिसांनी केले जेरबंद
पुणे / कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | येथील रुईकर कॉलनीत शीख समाजाचे राज्यस्तरीय क्रिकेट सामने (Cricket Match) सुरु होते. सामना सुरु असताना अचानक काही जण तेथे बसलेल्या प्रेक्षकांच्या दिशेने जाऊ लागले. हे पाहून त्यांच्यातील एक जण पळून जाऊ लागला. जवळच पार्क केलेली मोटारसायकल घेऊन तो जात असतानाच पाठलाग करुन त्याला पकडण्यात आले. त्याच्याकडे चौकशी केल्यावर तो गेली दीड वर्षे पुणे पोलिसांना (Pune Police) गुंगारा देणारा सराईत गुन्हेगार असल्याचे आढळून आले. केवळ वर्णनावरुन कोल्हापूर पोलिसांनी (Kolhapur Police) या गुंडाला पकडले. (Pune Crime)
खून, दरोडा, घरफोडी अशा गंभीर गुन्ह्यात गेली दीड वर्षाहून अधिक काळ पुणे पोलिसांना गुंगारा देणार्या कुख्यात गुन्हेगाराला कोल्हापूर पोलिसांनी जेरबंद केले आहे.
मख्खनसिंह अजितसिंग कल्याणी (४१, रा. रामटेकडी, हडपसर) असे या गुन्हेगाराचे नाव आहे. वानवडी पोलिसांनी काल रात्री कोल्हापूर पोलिसांकडून त्याला ताब्यात घेऊन पुण्यात आणले आहे. (Pune Crime)
मख्खनसिंह कल्याणी त्याच्याविरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, घरफोडी असे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. निशांत ननावरे याच्यावर २७ जुलै २०२० मध्ये रामटेकडी येथे मख्खनसिंह कल्याणी सह चौघांनी खूनाचा प्रयत्न केला होता. त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) फेटाळल्यानंतर तो फरार झाला होता.
कोल्हापूरातील रुईकर कॉलनीत क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
त्यात अनेक जिल्ह्यातून ४०० हून अधिक शीख बांधव खेळण्यासाठी व सामने पाहण्यासाठी आले आहेत.
शाहुपुरी पोलिसांना मख्खनसिंह हा रुईकर कॉलनीत सुरु असलेल्या क्रिकेट सामने पाहण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली.
संशयिताचा फोटो नसताना फक्त वर्णनावरुन पोलिसांनी गर्दीमध्ये मख्खनसिंह याला हेरले.
पोलिसांची चाहूल लागताच तो मोटारसायकलवरुन पळून जाऊ लागला. तेव्हा पोलिसांनी पाठलाग करुन त्याला पकडले.
याची माहिती वानवडी पोलिसांना दिल्यानंतर वानवडी पोलिसांचे (Wanwadi Police) पथक तातडीने कोल्हापूरात दाखल झाले.
त्यांनी मख्खनसिंह कल्याणी याला ताब्यात घेऊन पुण्यात आणले आहे.
Web Title :- Pune Crime | Pune Police Criminal Makkhan Singh Ajit Singh Kalyani was arrested by kolhapur police
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update