Pune Corona Update | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 125 नवीन रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहरामध्ये कोरोना बाधित (Pune Corona Update) रुग्णांच्या संख्येत मागील काही दिवसांपासून चढ-उतार पहायला मिळत आहे. शहरात मागील दोन-तीन दिवसांपासून बरे होणाऱ्या रुग्णांपेक्षा नवीन रुग्णांची संख्या जास्त आहे. आज पुणे शहरात कोरोनामुळे एकही मृत्यू झालेला नाही. त्यामुळे पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या 24 तासात पुणे शहरामध्ये कोरोनाच्या (Pune Corona Update) 125 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर 65 रुग्ण बरे झाले आहेत.

 

शहरात आजपर्यंत 45 लाख 11 हजार 144 प्रयोगशाळा चाचण्या करण्यात आल्या आहे. यामध्ये 6 लाख 61 हजार 323 इतके कोरोना बाधित रुग्ण (Pune Corona Update) आढळून आले आहे. त्यापैकी 6 लाख 51 हजार 248 इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात एकाही रुग्णांचा मृत्यू झालेला नाही. आतापर्यंत पुणे शहरात 9 हजार 348 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

 

पुणे शहरात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढल्याने अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची (Active Patient) संख्या कमी झाली आहे.
पुणे शहरामध्ये सध्या 727 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये 9 रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत.
नाॅन इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटर (Non-Invasive ventilator) 01 रुग्ण आहे.
एकूण अ‍ॅक्टिव्ह रुग्णांपैकी 3.85 टक्के रुग्ण हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत.

 

Web Title :- Pune Corona Update | Diagnosis of 125 new corona patients in Pune city in last 24 hours, find out other statistics

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

7th Pay Commission | मोदी सरकारकडून सरकारी कर्मचाऱ्यांना होळीचे गिफ्ट, एवढा वाढू शकतो DA?

 

Bipasha Basu Pregnancy News | ढगळ्या कपड्यांमध्ये करण सोबत दिसली बिपाशा बासू, फोटोपाहून चाहत्यांमध्ये रंगल्या तिच्या प्रेग्नेंसीच्या चर्चा…

 

NCP On Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या ‘पेन ड्राईव्ह बॉम्ब’ प्रकरणात मोठा ट्विस्ट ?; आता राष्ट्रवादीने केला ‘हा’ दावा !