Pune Corona Update | पुणेकरांची ‘कोरोना’वर मात ! 12 दिवसांत एकही मृत्यू नाही

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना महामारीत (Corona Epidemic) दोन वर्षात अनेकांना प्राण गमवावे लागले. कोरोनाच्या पहिल्या (Corona First Wave) आणि दुसऱ्या लाटेत (Second Wave) मृत्यूचे प्रमाण (Case Fatality Rate) 9 टक्क्यांपर्यंत पोहोचला होता. तिसऱ्या लाटेमध्ये (Third Wave) संक्रमीत होण्याची तीव्रता कमी असल्याने मृत्यूदर एक टक्क्याहून कमी नोंदवला गेला. तिसरी लाट ओसरत असताना मागील 12 दिवसात पुणे शहरात एकाही रुग्णाचा (Pune Corona Update) मृत्यू झालेला नाही. मार्च 2020 मधील मृत्यूचे प्रमाण दोन वर्षांमध्ये शून्यावर आले आहे, ही पुणेकरांसाठी दिलासादायक बाब आहे. पुणे शहरामध्ये 4 मार्च रोजी एका रुग्णाचा मृत्यू झाला (Pune Corona Update) होता. त्यानंतर 12 दिवसांत एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.

 

कोरोनाची लागण (Corona Infection) झालेल्या 60 वर्षापेक्षा जास्त वय असलेले ज्येष्ठ, उच्च रक्तदाब (High Blood Pressure), मधुमेह (Diabetes) अशा सहव्याधी असलेल्या रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण दोन्ही लाटांमध्ये जास्त होते. पहिल्या लाटेमध्ये ससून सर्वोपचार रुग्णालयात (Sassoon General Hospital) सर्वाधिक मृत्यूची नोंद झाली. दुसऱ्या लाटेत वेळेवर ऑक्सिजन (Oxygen), व्हेंटिलेटर (Ventilator)  न मिळाल्याने अनेक रुग्णांचा मृत्यू झाला. कोरोनाच्या पहिल्या लाटेत एप्रिल 2020 मध्ये पुणे शहराचा (Pune City) मृत्यूदर (Pune Corona Update) देशात सर्वाधिक असल्याचे पहायला मिळाले. 17 एप्रिल 2020 रोजी पुण्याचा मृत्यूदर 9.18 इतका होता. देशाच्या तुलनेत हा दर तीनपट जास्त होता.

भारतात दुसऱ्या लाटेत कोरोना बधित रुग्णांची संख्या सर्वोच्च 4 लाख एवढी होती.
दुसऱ्या लाटेमध्ये कोरोना बाधितांच्या मृत्यूचा आकडा पुणे शहरात जास्त होता.
शहरात एका आठवड्यात 400-450 मृत्यू झाले. रुग्णांना बेड, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर वेळेवर न मिळाल्याने अनेकांचा मृत्यू झाला.
दुसऱ्या लाटेत मृत्यूदर 6 टक्क्यांपर्यंत पोहोचला होता.
तर तिसऱ्या लाटेत शहराने रुग्णसंख्येत उच्चांक अनुभवला. परंतु मृत्यू दर 0.03 टक्के एवढा नगण्य होता.

 

Web Title :-  Pune Corona Update | pune coronavirus update punekars beat corona spread no death in last 12 days

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

EPFO | प्रॉव्हिडेंट फंडात रू. 2.50 लाखोपक्षा जास्तीच्या योगदानावर आता लागणार टॅक्स, जाणून घ्या 10 महत्वाचे मुद्दे

 

CoronaVirus | चीन आणि काही यूरोपीय देशांत पुन्हा वेगाने वाढल्या कोरोना केस, केंद्रीय आरोग्य सचिवांनी सर्व राज्यांना पत्र पाठवून दिले हे निर्देश

 

Reduce Risk Of Heart Attack | ब्लड प्रेशर आणि हार्ट अटॅकचा धोका कमी करतील ‘ही’ 5 फळे, उन्हाळ्यात डाएटमध्ये करा समावेश

 

Diabetes Diet | ‘ही’ 2 हिरवी पाने डायबिटीजमध्ये शुगर लेव्हल कंट्रोल करण्यासाठी आहेत आश्चर्यकारक, होतात जबरदस्त फायदे