Pune Corona Updates | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 3896 रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे महापालिका (Pune Corporation) हद्दीमध्ये मागील काही दिवसांपासून कोरोनाचा (Pune Corona Updates) प्रादुर्भाव वाढत आहे. रुग्ण वाढत असताना रुग्ण बरे (Recover) होण्याचे प्रमाण वाढल्याने दिलासा मिळाला आहे. पुणे शहरात गेल्या 24 तासात 3896 कोरोना बाधित रुग्णांचे (Pune Corona Updates) निदान झाले आहे. तर 6283 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्याचवेळी 14 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

 

 

पुणे महापालिकेच्या (PMC) आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार,
आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 11 हजार 372 स्वॅब तपासणी (Swab) करण्यात आली आहे.
यामध्ये 3896 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
त्यामुळे शहरातील एकूण कोरोना बाधितांची (Pune Corona Updates) संख्या 6 लाख 37 हजार 364 इतकी झाली आहे.
याच दरम्यान 6283 रुग्ण बरे झाले आहेत. आजपर्यंत 5 लाख 96 हजार 995 रुग्ण बरे झाले आहेत.

 

शहरातील अ‍ॅक्टिव्ह रुग्णांच्या (Active Patient) संख्या कमी झाली आहे.
सध्या शहरामध्ये 31 हजार 133 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
शहरातील अ‍ॅक्टिव्ह रुग्णांच्या तुलनेत केवळ 4.01 टक्के रुग्ण हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे.
यामध्ये 331 रुग्ण ऑक्सिजनवर (Oxygen) उपचार घेत आहेत.
इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटर (Invasive Ventilator) वर 56 तर नॅान इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटर (Non-Invasive Ventilator) 31 रुग्ण आहेत.
गेल्या 24 तासात 14 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील 8 तर शहराबाहेरील 6 रुग्णांचा समावेश आहे.
आजपर्यंत शहरातील 9236 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

 

 

Web Title :-  Pune Corona Updates | 3896 patients of Corona in Pune city in last 24 hours, find out other statistics

 

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

 

हे देखील वाचा

 

 

Nia Sharma – Madhuri Dixit | माधुरी दीक्षितच्या ‘चोली के पीछे क्या है’ गाण्यावर निया शर्मानं मारले जबरदस्त ठुमके, व्हिडिओ पाहून चाहते झाले घायाळ

 

Rakhi Sawant LipLock | फोटोग्राफरच्या सांगण्यावरून राखीनं चक्क कॅमेरासमोरच केलं पती रितेश सोबत LipLock

 

Urfi Javed Crying Video | हॉटेलमध्ये मुलासोबत असताना ढसा-ढसा रडली उर्फी जावेद, जाणून घ्या काय आहे कारण…

 

Cervical Cancer Symptoms And Precautions | प्रत्येक महिलेला आवश्य माहिती असावे काय आहे गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग, जाणून घ्या लक्षणे आणि बचाव