Pune Corona Updates | दिलासादायक ! पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 5271 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहरामध्ये कोरोनाचे (Pune Corona Updates) रुग्ण बरे होण्याची संख्या वाढत आहे. त्यामुळे थोडा दिलासा मिळाला आहे. गेल्या 24 तासात पुणे शहरामध्ये कोरोनाच्या (Pune Corona Updates) 2 हजार 075 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर 5 हजार 271 रुग्ण बरे झाले आहेत. मागील काही दिवसांपासून शहरातील नवीन रुग्णांच्या संख्येत चढ-उतार पहायला मिळत आहे. मात्र रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढल्याने शहरातील ॲक्टिव्ह रुग्णांची (Active Patient) संख्या कमी झाली आहे.

 

पुणे शहरात आजपर्यंत 43 लाख 45 हजार 792 प्रयोगशाळा चाचण्या करण्यात आल्या आहे.
यामध्ये 6 लाख 41 हजार 495 इतके कोरोना बाधित रुग्ण (Pune Corona Updates) आढळून आले आहे.
त्यापैकी 6 लाख 05 हजार 529 इतके रुग्ण बरे झाले आहेत.
पुण्यात गेल्या 24 तासात 17 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
यामध्ये शहरातील 09 तर हद्दीबाहेरील 08 रुग्णांचा समावेश आहे.
आतापर्यंत पुणे शहरात 9 हजार 254 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

 

पुणे शहरात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढल्याने ॲक्टिव्ह रुग्णांची (Active Patient) संख्या कमी झाली आहे. पुणे शहरामध्ये सध्या 26 हजार 712 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये 308 रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत. इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटर वर 49 तर नॅान इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटर 30 रुग्ण आहेत. एकूण ॲक्टिव्ह रुग्णांपैकी 4.42 टक्के रुग्ण हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत.

 

Web Title :- Pune Corona Updates | Comfortable Discharge of 5271 corona patients in Pune city in last 24 hours, find out other statistics

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा