Pune Corona Updates | अत्यंत चिंताजनक ! पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 4857 नव्या रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहरामध्ये कोरोनाचा (Pune Corona Updates ) संसर्ग होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. आज पुणे शहरातील नवीन कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. गेल्या 24 तासात पुणे शहरामध्ये कोरोनाच्या (Pune Corona Updates) 4857 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 1805 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात (Discharge) आले आहे. रुग्ण वाढत असताना ओमायक्रॉन (Omicron Covid) बाधित रुग्ण आढळून येत असल्याने चिंता वाढली आहे.

शहरात आजपर्यंत 40 लाख 28 हजार 304 चाचण्या करण्यात आल्या आहे. यामध्ये 5 लाख 37 हजार 418 इतके कोरोना बाधित रुग्ण (Pune Corona Updates) आढळून आले आहे. त्यापैकी 5 लाख 05 हजार 784 इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील एक तर हद्दीबाहेरील एका रुग्णाचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 9 हजार 131 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

पुणे शहरात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण घटल्याने अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची (Active Patient) संख्या वाढली आहे. पुणे शहरामध्ये सध्या 22 हजार 503 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये 162 रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत. इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटर वर 19 तर नॅान इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटर 14 रुग्ण आहेत. आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 20 हजार 801 स्वॅब तपासणी करण्यात आली आहे.

 

 

Web Title :- Pune Corona Updates | Extremely worrying! Diagnosis of 4857 new patients of Corona in Pune city in last 24 hours, find out other statistics

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Satara District Sessions Court | सातारा जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल ! जन्मदात्या बापाची हत्या करणार्‍या मुलाला अखेर जन्मठेप

Pimpri Corona Updates | चिंता वाढली! पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 2000 पेक्षा अधिक नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

PM Kisan Samman Nidhi Yojana | पीएम किसान योजनेचे पैसे ‘या’ शेतकऱ्यांना परत करावे लागणार; जाणून घ्या