पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Corona Updates | कोरोना व्हायरसच्या रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. देशासह राज्यातील आणि राज्यासह पुण्यातील कोरोनाच्या नवीन आढळून येणार्या रूग्णांची संख्या वाढत आहे. पुण्यात गेल्या 24 तासात कोरोनाचे तब्बल 8 हजार 301 नवे रूग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे पुणेकरांची चिंता वाढली आहे. दरम्यान, दिवसभरात तब्बल 5 हजार 480 रूग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. (Pune Corona Updates)
पुणे शहरात गेल्या 24 तासात कोरोनामुळं 10 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये पुणे शहरातील चौघांचा तर पुण्याबाहेरील 6 जणांचा समावेश आहे. पुण्यातील कोरोनाबाधितांची (Coronavirus) संख्या आता 5 लाख 91 हजार 834 वर जाऊन पोहचली आहे. त्यामध्ये समाधानाची बाब म्हणजे आता पर्यंत 5 लाख 37 हजार 581 रूग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या पुण्यातील कोरोनाच्या सक्रिय रूग्णांची संख्या 45 हजार 81 वर जाऊन पोहचली आहे. एकुण अॅक्टिव्ह रूग्णांपैकी 297 रूग्णांना ऑक्सिजनवर उपचार देण्यात येत आहेत. सक्रिय रूग्णांपैकी इनव्हॅजिव्ह व्हेंटिलटर आणि 27 नॉन इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटरवर आहेत. पुणे शहरात आतापर्यंत कोरोनामुळं तब्बल 9 हजार 172 जणांचा मृत्यू झाला आहे. (Pune Corona Updates)
आज पुण्यात तब्बल 20 हजार 338 जणांचे स्वॅब घेण्यात आले होते. त्यापैकी तब्बल 8 हजार 301 रूग्णांचा कोरोनाचा अहवाल सकारात्मक (Corona Positive) आला आहे. प्रशासनाकडून (Pune Corporation) वेळावेळी गर्दी करू नका, घराबाहेर पडताना मास्क परिधान करा अशा प्रकारच्या सुचना देण्यात आल्या आहेत. शहरात विनामास्क फिरणार्या शेकडो जणांवर दररोज (Pune Police) कारवाई होत आहे.
Web Title :- Pune Corona Updates | Worrying! More than 8300 new corona patients in Pune in last 24 hours, find out other statistics
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update