Pune Corona : दिलासादायक ! पुणे शहरात गेल्या 24 तासात 388 रुग्ण ‘कोरोना’मुक्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहरामध्ये कोरोनाचा (Corona in Pune city) प्रादुर्भाव कमी होत असल्याचं पहायला मिळत आहे. पुण्यात रुग्ण संख्या वाढत असल्याने लॉकडाऊन (Lockdown) करण्यात आल्याने रुग्ण वाढीला ब्रेक (Break patient growth) लागला आहे. मागील काही दिवसांपासून शहरामध्ये नवीन रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त (Recover) होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. गेल्या 24 तासात पुणे शहरामध्ये 242 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 388 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

पुणे शहरात आजपर्यंत 4 लाख 74 हजार 112 इतके कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यापैकी 4 लाख 62 हजार 610 इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 16 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील 9 तर पुणे महापालिका हद्दीबाहेरील 7 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 8475 जणांचा कोरोनामुळे (Corona) मृत्यू झाला आहे.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

पुण्यात 511 रुग्ण गंभीर

शहरामध्ये सध्या 3027 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण (Active patient) आहेत. यामध्ये 511 रुग्ण गंभीर आहेत. तर 822 रुग्ण ऑक्सिजनवर (Oxygen) उपचार घेत आहेत. आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 5532 स्वॅब तपासणी करण्यात आली आहे. आज पर्यंत शहरात 25 लाख 78 हजार 773 प्रयोगशाळा चाचण्या (Laboratory test) करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. (Health Department of Pune Municipal Corporation)

पुणे जिल्ह्याचा रिकव्हरी रेट वाढला
पुणे जिल्ह्यातील कोरोना (Corona) बाधीत एकूण 10 लाख 30 हजार 863 रुग्णांपैकी 9 लाख 99 हजार 826 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.
ॲक्टिव्ह रुग्ण 13 हजार 710 आहे.
कोरोनाबाधित एकूण 17 हजार 327 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
मृत्यूचे प्रमाण 1.68 टक्के इतके आहे तर बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 96.99 टक्के आहे.

Wab Title :- pune corona virus news updates today | policenama

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pan Card Online Application | डॉक्युमेंटची गरज नाही, फक्त 10 मिनिटांत बनवा Pan Card, जाणून घ्या सोपी प्रक्रिया

सिमेंट सेक्टरमध्ये उतरणार अदानी ग्रुप, लाँच केली नवीन कंपनी Adani Cement

 

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा