Coronavirus : पुण्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 1700 नवे पॉझिटिव्ह तर 38 जणांचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्याचं समोर येणार्‍या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. गेल्या 24 तासात पुणे शहरात कोरोनाचे 1700 नवे पॉझिटिव्ह आढळून आले आहेत तर पुणे शहरातील तब्बल 38 जणांचा आज दिवसभरात मृत्यू झाला आहे. पुण्याबाहेरील 12 जणांचा आज पुणे शहरात मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता पुणे शहरात कोरोनामुळं मृत्यू झालेल्यांची संख्या 3084 वर जाऊन पोहचली आहे. दरम्यान, आज दिवसभरात तब्बल 1545 रूग्णांनी कोरोनावर मात केली असून ते उपचारानंतर बरे झाले आहेत. त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

सध्या पुणे शहरातील कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 31 हजार 781 वर जावून पोहचली आहे. त्यामध्ये सर्वात समाधानाची बाब म्हणजे 1 लाख 10 हजार 916 रूग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. त्यांना हॉस्पीटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या पुणे शहरात कोरोनाचे 17 हजार 781 अ‍ॅक्टीव्ह रूग्ण आहेत. एकुण अ‍ॅक्टीव्ह रूग्णांपैकी तब्बल 961 रूग्ण हे क्रिटिकल असून त्यापैकी 494 रूग्णांना व्हेंटिलेटरवरून उपचार देण्यात येत आहेत. नागरिकांनी घराबाहेर पडताना मास्क परिधान करावे तसेच सोशल डिस्टेन्सिंगच्या नियमांचं पालन करावं असं आवाहन प्रशासनाकडून वेळावेळी करण्यात आलं आहे.