Coronavirus : पुण्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 1621 नवे पॉझिटिव्ह तर 41 जणांचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. केंद्र आणि राज्य सरकार व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न करीत आहेत. पुणे शहरात गेल्या 24 तासात कोरोनाचे 1621 नवे पॉझिटिव्ह आढळून आले आहेत तर दिवसभरात पुण्यातील 41 जणांचा मृत्यू झाला आहे. पुण्याबाहेरील 21 जणांचा आज पुणे शहरात मृत्यू झाला आहे. त्यामुळे पुणे शहरात आतापर्यंत कोरोनामुळं 3296 जणांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरातील समाधानाची बाब म्हणजे आज 1256 रूग्ण हे उपचारानंतर बरे झाले असून त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

सध्या पुणे शहरातील एकुण कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 38 हजार 951 वर जाऊन पोहचली आहे. आतापर्यंतची सर्वात समाधानाची बाब म्हणजे तब्बल 1 लाख 17 हजार 882 रूग्ण हे उपचारानंतर बरे झाले असून त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या पुणे शहरात कोरोनाचे 17 हजार 773 अ‍ॅक्टीव्ह रूग्ण आहेत. एकुण अ‍ॅक्टीव्ह रूग्णांपैकी तब्बल 949 रूग्ण हे क्रिटिकल असून त्यापैकी 523 रूग्णांना व्हेंटिलेटरवरून उपचार दिले जात आहेत. नागरिकांनी घराबाहेर पडल्यानंतर सोशल डिस्टेन्सिंगच्या नियमाचं पालन करावं तसेच घराबाहेर पडताना मास्क परिधान करावं असं आवाहन प्रशासनाकडून वेळावेळी करण्यात आलं आहे.