Coronavirus : पुण्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 303 नवे पॉझिटिव्ह तर 16 जणांचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वच स्तरातून प्रयत्न सुरू आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात कोरोनाचे 303 नवे पॉझिटिव्ह आढळून आले असून शहरातील 16 जणांचा मृत्यू झाला आहे. पुण्याबाहेरील 7 जणांचा कोरोनामुळं आज पुणे शहरात मृत्यू झाला आहे. त्यामुळं पुणे शहरात आतापर्यंत कोरोनामुळं 4 हजार 195 जणांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरातील समाधानाची बाब म्हणजे आज 463 रूग्ण हे उपचारानंतर बरे झाले असून त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

सध्या पुणे शहरातील कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 60 हजार 677 वर गेली आहे. त्यामध्ये सर्वात दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत 1 लाख 50 हजार 863 रूग्ण हे उपचारानंतर बरे झाले असून त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या पुणे शहरात कोरोनाचे 5 हजार 659 अ‍ॅक्टीव्ह रूग्ण आहेत. एकुण अ‍ॅक्टीव्ह रूग्णांपैकी 581 रूग्ण हे क्रिटिकल असून त्यापैकी 332 रूग्णांना व्हेंटिलेटरवरून उपचार दिले जात आहेत.