Coronavirus : सावधान ! पुण्यातील नव्या कोरोना पॉझटिव्ह रूग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली, जाणून घ्या गेल्या 24 तासातील आकडेवारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरात गेल्या 24 तासात कोरोनाचे 411 नवे पॉझिटिव्ह आढळून आले असून दिवसभरात शहरातील 7 जणांचा मृत्यू झाला आहे. पुण्याबाहेरील एकाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे पुणे शहरात आजपर्यंत कोरोनामुळं 4 हजार 407 जणांचा मृत्यू झाला आहे. आज दिवसभरात 316 जण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

पुण्यातील एकुण कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 65 हजार 837 वर जाऊन पोहचली आहे. सर्वात समाधानाची बाब म्हणजे आतापर्यंत तब्बल 1 लाख 56 हजार 955 रूग्ण हे उपचारानंतर बरे झाले असून त्यांना हॉस्पीटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या शहरात कोरोनाच्या अ‍ॅक्टीव्ह रूग्णांची संख्या 4 हजार 475 एवढी आहे. एकुण अ‍ॅक्टीव्ह रूग्णांपैकी 385 रूग्ण हे क्रिटिकल असून त्यापैकी 250 जणांना व्हेंटिलेटरवरून उपचार देण्यात येत आहेत.