Coronavirus : पुण्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’मुळं 27 जणांचा मृत्यू, जाणून घ्या इतर आकडेवारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्थानिक प्रशासन युध्द पातळीवर काम करत आहे. दरम्यान, पुणे शहरात गेल्या 24 तासात कोरोनाचे 1440 नवे पॉझिटिव्ह आढळून आले आहेत तर दिवसभरात 27 जणांचा मृत्यू झाले आहेत. पुणे शहराच्या बाहेरील 5 जणांचा आज पुण्यात मृत्यू झाला आहे. पुणे शहरात कोरोनामुळं मृत्यू झालेल्यांची संख्या 1456 वर जावून पोहचली आहे. दरम्यान, दिवसभरात 1196 रूग्ण हे उपचारानंतर बरे झाले असून त्यांना हॉस्पीटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

सध्या पुणे शहरात एकुण बाधितांची संख्या ही 62037 वर जावून पोहचली आहे. सर्वात समाधानाची बाब म्हणजे आतापर्यंत तब्बल 43606 रूग्ण हे उपचारानंतर बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या पुणे शहरात 16975 रूग्ण हे अ‍ॅक्टीव्ह आहेत. एकुण अ‍ॅक्टीव्ह रूग्णांपैकी 674 रूग्ण हे क्रिटिकल असून त्यापैकी 425 रूग्णांना व्हेंटिलेटवरून उपचार देण्यात येत आहेत. अलिकडील काळामध्ये रूग्ण बरे होण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. दरम्यान, घराबाहेर पडताना नागरिकांनी मास्कचा वापर करावा तसेच सोशल डिस्टेन्सिंगचे पालन करावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.