Coronavirus : धोका वाढला ! गेल्या 24 तासात पुणे शहरात आतापर्यंतचे विक्रमी ‘कोरोना’ पॉझिटिव्ह आढळले, जाणून घ्या आकडेवारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसनं संपुर्ण देशात थैमान घातलं आहे. कोरोनाचा कहर सुरूच आहे. दिल्ली, मुंबईसह देशातील काही ठिकाणी कोरोनाचे रूग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. दरम्यान, पुण्यात गेल्या 24 तासात कोरोनामुळं 19 जणांचा बळी गेला असून तब्बल 877 नवे कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. कोरोनामुळं पुण्यात आतापर्यंत तब्बल 662 जणांचा मृत्यू झाला आहे.

पुणे शहरातील एकुण कोरोनाबाधितांची संख्या आता 18105 वर जाऊन पोहचली आहे. दरम्यान, सद्यस्थितीत शहरात 6403 रूग्ण हे अ‍ॅक्टीव्ह आहेत. समाधानाची बाब म्हणजे आतापर्यंत तब्बल 11040 रूग्ण हे उपचारानंतर बरे झाले असून त्यांना हॉस्पीटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज आढळून आलेल्या 877 पॉझिटिव्ह रूग्णांमध्ये ससून, नायडू आणि इतर खासगी रूग्णालयातील रूग्णांचा समावेश आहे.

अ‍ॅक्टीव्ह असलेल्या 6402 रूग्णांपैकी 347 रूग्ण हे क्रिटिकल असून त्यांच्यावर उपचार चालू आहेत. त्यापैकी 55 रूग्ण हे व्हेंटिलेटरवरून उपचार घेत आहेत. पुणे शहरात शहरात गेल्या काही दिवसांपासून 500 हून जास्त रूग्ण पॉझिटिव्ह आढळून आल्याने पुणेकरांची चिंता वाढली आहे. पुण्यात आतापर्यंत 662 जणांचा कोरोनामुळं बळी गेला आहे. दरम्यान, दिवसभरात 589 रूग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना हॉस्पीटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.