Coronaviurs : पुण्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’मुळं 35 जणांचा मृत्यू, जाणून घ्या इतर आकडेवारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र, राज्य सरकार युध्दपातळीवर प्रयत्न करीत आहे. स्थानिक प्रशासन देखील 24 तास कार्यरत आहे. दरम्यान, गेल्या 24 तासात पुण्यात कोरोनामुळं शहरातील तब्बल 35 जणांचा मृत्यू झाला आहे. पुण्या बाहेरील 11 जणांचा देखील दिवसभरात मृत्यू झाला आहे. त्यामुळं पुण्यात आतापर्यंत कोरोनामुळं मृत्यू झालेल्यांचा आकडा 1656 वर पोहचला आहे. दिवसभरात कोरोनाचे 1091 नवे पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. समाधानाची बाब म्हणजे आज दिवसभरात 1156 जण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना हॉस्पीटलमधील डिस्चार्ज देण्यात आला आहे.


पुणे शहरात आता एकुण कोरोनाबाधितांची संख्या 70316 वर जावुन पोहचली आहे. सर्वात समाधानाची बाब म्हणजे आतापर्यंत तब्बल 53958 रूग्ण हे उपचारानंतर बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या पुणे शहरात एकुण 14712 रूग्ण हे अ‍ॅक्टिव्ह आहेत. एकुण अ‍ॅक्टिव्ह रूग्णांपैकी 737 रूग्ण हे क्रिटिकल असून त्यापैकी 448 रूग्णांना व्हेंटिलेटरवरून उपचार देण्यात येत आहेत.