Pune Corporation | पुणे महापालिकेच्या स्थायी समिती बैठकीवर सर्व पक्षीय सदस्यांचा बहिष्कार ! जाणून घ्या प्रकरण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  Pune Corporation | स्थायी समिती अध्यक्षांच्या आदेशानंतरही महापालिका (Pune Corporation) आयुक्त विक्रम कुमार (pmc commissioner vikram kumar) यांनी अंदाजपत्रकातील खर्चाचे ‘निर्बंध’ कायम ठेवल्याने स्थायी समितीची आजची बैठक (standing committee meeting) पावणेदोन तासापासून सुरूच होऊ शकली नाही. विशेष असे की आयुक्त जो पर्यंत वित्तीय समिती बरखास्त करून अंदाजपत्रकातील कामांना मंजुरी देत नाहीत तोपर्यंत बैठकीवर ‘बहिष्कार’ घालण्याची भुमिका भाजपसह (BJP) सर्वच पक्षांच्या सदस्यांनी घेतल्याने वातावरण तापले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उत्पन्न घटल्याने राज्य शासनाने मागीलवर्षी सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांवर अत्यावश्यक खर्च व कोरोना प्रतिबंध करण्यासाठी येणारा खर्च करण्यास प्राधान्य देण्याचे आदेश दिले होते. यंदाही तशीच परिस्थिती असल्याने महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्या अध्यक्षतेखाली वित्तीय समितीची स्थापना करण्यात आली. या समितीमध्येच कामाचे निर्णय घेतले जातात.

दरम्यान, कोरोनाकाळात पुणे महापालिकेने (Pune Corporation) मागीलवर्षीही
इतर महापालिकेच्या तुलनेत चांगले उत्पन्न मिळवले आहे.
यंदाही पहिल्या चार महिन्यात चांगले उत्पन्न मिळाले आहे.
वर्ष अखेर पाच हजार कोटी रुपयांहून अधिक उत्पन्न मिळेल.
त्यामुळे वित्तीय समिती बरखास्त करून अंदाजपत्रकाची 100 टक्के अंमलबजावणी करावी
असे आदेश स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने (standing committee chairman hemant rasane) यांनी दोन आठवड्यांपूर्वी आयुक्तांना दिले होते.
मात्र आयुक्तांनी त्यावर अद्याप निर्णय घेतला नाही.

 

यामुळे सर्वच नगरसेवक संतप्त झाले आहेत. निवडणूक जवळ आली आहे.
मागील वर्षीही काही कामे करता आलेली नाहीत.
अशा परिस्थितीत अर्धवट कामे पूर्ण करणे आणि किरकोळ कामे करण्यासाठीही
निधी मिळत नसल्याने नागरिकांच्या तक्रारी वाढत आहेत.
यापार्श्वभूमीवर आयुक्तांनी स्थायी समिती अध्यक्षांच्या आदेशाची अंमलबजावणी करावी अन्यथा
आजच्या बैठकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय समितीच्या सर्वच सदस्यांनी घेतल्याने
पालिकेत वातावरण तापले आहे.

 

Web Title : Pune Corporation | All party members boycott Pune Municipal Corporation standing committee meeting!

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

ACB Police Inspector Transfer | अ‍ॅन्टी करप्शन विभागातील 34 अधिकार्‍यांच्या अंतर्गत बदल्या अन् नियुक्त्या

Gold Price Update | 8666 रुपये प्रति तोळा ‘स्वस्त’ मिळतंय सोनं, येथे जाणून घ्या 14 ते 24 कॅरेट सोन्याचे नवीन दर

SBI special FD scheme | पुढील आठवड्यात बंद होतेय SBI Platinum योजना, गुंतवणूक करण्यापूर्वी जाणून घ्या पूर्ण माहिती