Pune Corporation | पुणे महापालिकेतील सत्ताधाऱ्यांना ‘अजेंडा’ पूर्ण करण्याची संधी !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Corporation | राज्य निवडणूक आयोगाच्या (State Election Commission) आदेशानुसार मार्च मध्ये प्रभाग रचना (PMC Ward Structure) अंतिम होणार असल्याने या टर्ममधील नगरसेवकांना अगदी शेवटच्या दिवसापर्यंत ‘विकासकामे’ (PMC Development Work) येणार आहेत. तर सत्ताधारी भाजपलाही (BJP) निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्वाकांक्षी आणि दीर्घकालीन प्रकल्पांची मुहूर्तमेढ रोवण्याची संधी निर्माण झाली आहे. (Pune Corporation)

 

राज्य निवडणूक आयोगाने प्रारूप प्रभाग रचनेचा कार्यक्रम नुकताच जाहीर केला आहे. त्यानुसार 2 मार्च नंतर प्रभाग रचना अंतिम होणार आहे. यामुळे एरव्ही निवडणुकीच्या वर्षी जानेवारीच्या पहिल्याच आठवड्यात निवडणूक आचारसंहिता लागत असल्याने विकासकामांची डेडलाईन शक्यतो डिसेंबरच होती. अंतिम वर्षांतील शेवटचे 9 महिनेच मिळत असल्याने निवडणुकीची तयारी व विकासकामे यामध्ये नगरसेवकांची (PMC Corporators) मोठी धावपळ होत असे. परंतु यंदा निवडणूक प्रक्रियेला विलंब झाल्याने नगरसेवकांना तीन महिन्यांचा बोनस कालावधी मिळाला आहे. (Pune Corporation)

 

प्रामुख्याने अगदी शेवटपर्यंत स्थायी समितीसह सर्व समित्या व सर्वसाधारण सभेचे (PMC General Body Meeting) काम चालणार असल्याने सत्ताधारी भाजपला निवडणुकीच्या अजेंड्यावरील महत्वाकांक्षी प्रकल्पांची पायाभरणी करण्याची आयतीच संधी चालून आली आहे. तर नगरसेवकानाही शेवटच्या टप्प्यात ज्या प्रभागातून आगामी निवडणुकीला सामोरे जायचे आहे, त्या प्रभागात मतदारांना आकर्षित करण्यासाठी संधी प्राप्त होणार आहे.

 

सत्ताकेंद्र ठरणार अडथळा

राज्यात महाविकास आघाडी सरकार (Maha Vikas Aghadi Government) आहे. तर महापालिकेत भाजपची (BJP in PMC) सत्ता आहे. मोठ्या प्रकल्पात राज्य शासनाचा सहभाग असल्याने महाविकास आघाडीला राज्य शासनाला विश्वासात घेऊनच पुढे जावे लागणार आहे. तसेच महापालिका आयुक्तांनी कोरोना मुळे खर्च वाढला व अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने या अनावश्यक विकासकामांवर ‘वित्तीय’ समितीच्या माध्यमातून अंकुश ठेवला आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि नगरसेवक ही मिळालेल्या संधीचा किती लाभ उठवणार ? याबाबत अनेक मतप्रवाह आहेत.

 

Web Title :- Pune Corporation | Opportunity for Pune Municipal Corporation ruling BJP to complete agenda !

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा