Pune Corporation | बकेट, कापडी पिशव्या, बेचेंस खरेदीला शहर कॉंग्रेसकडून विरोध; महापालिकेतील ‘कॉंग्रेस’ची झाली ‘गोची’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  पैशांची उधळपट्टी म्हणून महापालिका आयुक्तांनी (PMC Commissioner) थांबविलेली ‘कचर्‍याच्या बकेट, कापडी पिशव्या, बेचेंस ’ खरेदीचा निर्णय ‘जनतेच्या मागणीमुळे’ केल्याचा दावा पालिकेतील (Pune Corporation) सर्वच राजकीय पक्षांनी केला आहे. या निर्णयाला स्थानीक संघटनांनी विरोध केला आहे. मात्र, आज शहर कॉंग्रेसनेही (Pune City Congress) आयुक्तांनी या वस्तु खरेदीला मान्यता देउ नये, अशी मागणी करत पालिकेतील (Pune Corporation) ‘कॉंग्रेस’ पदाधिकार्‍यांची ‘गोची’ केली आहे.

 

खरेदीतील भ्रष्टाचारामुळे चर्चेत आलेली बकेट, कापडी पिशव्या आणि बेचेंस खरेदीला महापालिका (Pune Corporation)
आयुक्तांनी कोरोना काळातील उत्पन्नाची स्थिती पाहून ब्रेक लावला होता.
मात्र, नुकतेच झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये (PMC GB Meeting) आलेल्या २०१९ चा या वस्तू खरेदीस काही
अंशी परवानगी देण्याचा प्रस्ताव सर्व पक्षीय सदस्यांनी एकमताने कुठल्याही चर्चेशिवाय क्षणात मंजुर केला.
खरेदीतील भ्रष्टाचार आणि उधळपट्टीवर अनेक वर्षे लढा देणार्‍या स्वंयसेवी संघटनांनी सर्वसाधारण सभेच्या या निर्णयाला विरोध केला.
आयुक्तांनी या प्रस्तावाची अंमलबजावणी करू नये, अशी मागणी केली.
परंतू यानंतरही भाजप, राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस आणि शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी जनतेच्या मागणीमुळेच केवळ या वस्तुंची केवळ
१० लाख रुपयांपर्यंत मर्यादीत खरेदी करण्यात येणार असून या वस्तुंवर कुठल्याही पक्षांची नावे, चिन्हे अथवा ध्वजांची रंगसंगती नसेल अशी भुमिका घेत निर्णयाचे समर्थनच केले.

दरम्यान आज शहर कॉंग्रेसने बकेट, पिशव्या आणि बेचेंस खरेदीच्या निर्णयाला विरोध करत आयुक्तांनी या निर्णयाची अंमलबजावणी करू नये असे निवेदन दिले आहे.
या निर्णयाची अंमलबजावणी केल्यास आंदोलन करण्याचाही इशारा शहर अध्यक्ष रमेश बागवे (Ramesh Bagwe), प्रदेश कॉंग्रेसचे सरचिटणीस विरेंद्र किराड
(Virendra Kirad) आणि संजय बालगुडे (Sanjay Balgude) यांनी दिला आहे.
आम आदमी पार्टीनेही महापालिका आयुक्तांना या वस्तुंची खरेदी थांबवावी अशी मागणी केली आहे.
आम आदमी पार्टीचे (aam aadmi party) राज्य संघटक विजय कुंभार (Vijay Kumbhar) यांनी यासंदर्भात महापालिका आयुक्तांना विस्तृत खुले पत्र लिहीले आहे.

 

Web Title : Pune Corporation | puen city congress pmc commissioner pune corporation news in marathi

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Rakesh Jhunjhunwala | राकेश झुनझुनवाला यांना ‘या’ गुंतवणुकीवर मिळेल 6 पट रिटर्न, येणार आहे कंपनीचा IPO

Pune Corona | पुणे शहरात ‘कोरोना’च्या 90 नवीन रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

Will Smith | ‘ब्रेकअपनंतर मी असंख्य महिलांशी सेक्स केलं’; ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याने केला खुलासा