Pune Covid Update | पुण्यात कोरोना रुग्ण संख्येत वाढ, रुग्णालयातील कोरोना वॉर्ड पुन्हा सुरु होणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Covid Update | देशाची राजधानी दिल्लीत कोरोना रुग्णांची (Corona Patients) संख्या वाढत असताना सांस्कृतिक राजधानी समजल्या जाणाऱ्या पुण्यात देखील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने प्रशासन आता अलर्ट मोडवर आले आहे. सध्या पुणे शहरातील कोरोना (Pune Covid Update) रुग्णांची संख्या वाढत असल्याने पुणे शहरातील काही रुग्णालयांनी पुन्हा एकदा कोरोना वॉर्ड सुरु केले आहेत.

 

नोबेल हॉस्पिटल (Noble Hospital), के.ई.एम. रुग्णालय (K.E.M. Hospital) आणि दिनानाथ मंगेशकर (Dinanath Mangeshkar) रुग्णालयात देखील कोरोना रुग्णांना विलिगीकरणात ठेवले जात आहे. रुग्णसंख्या झपाट्याने वाढली तर रुग्णांना कोणतीही अडचण येऊ नये म्हणून सुरुवातीपासूनच खबरदारी घेतली जात आहे. पुणे जिल्ह्यात सध्या 765 सक्रिय रुग्ण आहेत. त्यापैकी केवळ 36 रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत तर 729 रुग्ण हे घरीच उपचार घेत आहेत. घरी उपचार घेत असलेल्या रुग्णांमध्ये कोरोनाची सौम्य लक्षण आहेत. परंतु येत्या काही दिवसांत रुग्ण वाढू शकतात.

 

पुणे शहरात रुग्ण संख्या वाढत असल्याने कोरोना टेस्ट (Corona Test), आरटीपीसीआर (RTPCR) आणि इतर चाचण्या कराव्यात अशा सूचना आरोग्य विभागाला ( Health Department) देण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रशासनावरील ताण वाढला आहे. रुग्ण वाढत असल्याने पुन्हा एकदा कोरोना वॉर्ड सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.

सहायक आरोग्य अधिकारी डॉ. संजीव वावरे (Dr. Sanjeev Vawre) यांनी सांगितले, मार्चमध्ये शहरात कोरोनामुळे तीन जणांचा मृत्यू झाला आहे. देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे आम्ही दक्षता वाढवत आहेत. आम्ही आमच्या OPD मध्ये स्वॅब कलेक्शन सेंटर्स उपलब्ध केले आहेत. त्यामुळे पुणेकरांनी काळजी करण्याची नाही तर काळजी घेण्याची गरज आहे.

 

रुग्णालयात लस नाही

 

कोरोना सक्रिय रुग्ण सर्वाधिक असताना पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation)
एकाही रुग्णालयात लस उपलब्ध नसल्याची माहिती समोर आली आहे. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण (Vaccination) महत्त्वाचं आहे.
परंतु पुण्यात लसीचा तुटवडा आहे.
त्यामुळे लस घेण्यासाठी पुणेकरांना वणवण फिरावं लागत आहे. नायडू रुग्णालय, कमला नेहरु,
ससून हॉस्पिटल, सुतार दवाखाना यासारख्या पालिकेच्या रुग्णालयात लस उबलब्ध नसल्याने लसीकरण बंद ठेवण्यात आले आहे.
पुढील पाच दिवस हे लसीकरण केंद्र बंद ठेवले जाणार असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.

 

Web Title :- Pune Covid Update | corona ward started in dinanath hospital kem hospital and nobel hospital


Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update


हे देखील वाचा

 

Maharashtra Politics News | आनंद दिघेंच्या मृत्यूबाबत शिंदे गटाच्या महिला नेत्याचा खळबळजनक दावा, म्हणाल्या-
‘उद्धव ठाकरे भेटून गेले अन्…’

MP Navneet Rana | ‘उद्धव ठाकरे, तुम किस खेत की मूली हो’, भर सभेत नवनीत राणांचा हल्लाबोल