Pune CP Amitabh Gupta On Traffic Police | पोलिस आयुक्तांच्या रडारवर वाहतूक अमलदारही; विशेष पथकांचा ‘वॉच’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune CP Amitabh Gupta On Traffic Police | वाहतूक अमलदारांनो सावधान तुम्ही जर पीकअव्र्हरमध्ये चौकात नियमन करताना दिसून न आल्यास थेट कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. त्यासाठी खास पथकांकडून वॉच ठेवला जात असून दरदिवशी चौकात हजर-गैरहजरचा अहवाल वरिष्ठांना सादर करण्यात येत आहे. वारंवार चौक सोडून गायब होणार्‍या अमलदारांची उचलबांगडी करण्यात येणार आहे. (Pune CP Amitabh Gupta On Traffic Police)

 

चौकाचौकात नियुक्त करण्यात आलेले वाहतूक अमलदार आणि अधिकारी चौकात नियमन करतात की नाही, याबाबत माहिती घेण्यासाठी खास पथकाकडून वॉच ठेवण्यात येत आहे. कर्मचारी अधिकारी वाहतूक नियमन करीत आहेत का, परिसरातील वाहतूकीचा अहवाल पथकाकडून दरदिवशी वरिष्ठ अधिकार्‍यांना सादर करण्यात येत आहे. वाहतूककोंडीमुळे मागील काही महिन्यांपासून नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत होता. पुणेकरांसह राजकीय पक्षांनी वाहतूककोंडीबाबत प्रचंड नाराजी व्यक्त केली होती. त्यापाश्र्वभूमीवर पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी तडकाफडकी निर्णय घेत वाहतूक शाखेच्या कामकाजावर देखरेख ठेवण्यासाठी DCP भाग्यश्री नवटके (IPS Bhagyashree Navtake) यांच्याकडे सोपविला आहे.

 

खुर्चीचा आधार अन् टाईमपास टाळा
चौका-चौकात वाहतूक नियमनासाठी नियुक्त केलेले अमलदार आणि अधिकारी ड्युटीवेळी कोठे गायब होतात, यासंदर्भात पथकांकडून डेटा एकत्रित केला जात आहे. त्याबाबत अहवाल सादर करून संबंधिताविरूद्ध कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. त्याशिवाय वाहतूक विभाग प्रमुखाची खरडपट्टी काढली जाणार आहे. त्यामुळे वाहतूक अमलदारांनो ड्युटीवेळी खुर्चीवर गप्पा मारत बसणे, चौकाशेजारील दुकानात आधार घेणे, वाहतूक नियमनाऐवजी जवळच घर असल्यास वामकुक्षीसाठी जाण्यास टाळावे लागणार आहे.

वाहतूककोंडी होण्यास मुख्य कारणे
मेट्रोचे काम, रस्ते दुरूस्ती, खड्डे, पावसामुळे कोंडीत भर टाकली आहे. त्यामुळे शहरासह उपनगरांमध्ये वाहतूककोंडी वाढली आहे.
त्याशिवाय बेशिस्त वाहनचालक, अरूंद रस्ते, सिग्नलली कमतरता असल्याचाही फटका बसला आहे.
तसेच वाहतूक नियमन करण्यासाठीत तैनात असलेले अमलदार तासनतास गायब होत असल्यामुळे वाहतूक चा फज्जा उडत आहे.

 

Web Title :- Pune CP Amitabh Gupta On Traffic Police

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Eknath Khadse | खडसेंवरील ‘झोटिंग समिती’चा अहवाल विधिमंडळात सादर करण्याची गिरीश महाजनांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

WhatsApp Down | व्हॉट्सॲप कधी सुरु होणार? कंपनीने दिले स्पष्टीकरण

Dada Bhuse | बंगल्यात शिरलेल्या दरोडेखोराला मंत्री दादा भुसेंनी पकडले, नंतर पोलिसांच्या केले स्वाधीन