Pune CP Amitabh Gupta On Traffic Problem | वाहतुक समस्या व कोंडी सोडविण्यासाठी पोलिस आयुक्त अमिताभ गुप्तांचा मोठा निर्णय ! 300 पोलिस ट्रॅफिक ब्रँचशी सलग्न, अधिकार्‍यांचाही समावेश

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune CP Amitabh Gupta On Traffic Problem | पुणे पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये गंभीर बनत असलेली वाहतुक समस्या (Traffic Problem) आणि वारंवार होणारी कोंडी सोडविण्यासाठी पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता (Pune CP Amitabh Gupta) यांनी मोठा निर्णय घेतला आहे. आयुक्तांनी तब्बल सुमारे 30 पोलिस अधिकारी आणि सुमारे 270 पोलिस कर्मचार्‍यांना वाहतूक शाखेशी (Traffic Branch) संलग्न केले आहे. सलग्न करण्यात आलेल्यांना सध्यातरी वाहतूक नियमनाशिवाय इतर दुसरे कुठलेली काम देवू नये असा आदेशच सह आयुक्त संदीप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik) यांनी काढला आहे. (Pune CP Amitabh Gupta On Traffic Problem)

 

पुणे शहरातील वाहतूक कोंडी नित्याचीच बाब झाली आहे. वारंवार सांगूनही नियोजनावर भर देण्याऐवजी वाहतूक पोलीस (Traffic Police) दंड वसूल करण्यात मग्न असल्याचे प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळत आहे. दिवाळीच्या (Diwali) पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येने नागरिक खरेदीसाठी घराबाहेर पडत असल्याने शहरातील सर्वच रस्त्यावर प्रामुख्याने मुख्य रस्त्यांवर वाहतूक कोंडी (Traffic Jam) मोठ्या प्रमाणात होत आहे. यापार्श्वभूमीवर भाजपच्या (BJP) एका शिष्टमंडळाने पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची भेट घेऊन यावर उपाययोजना करण्याची मागणी केली होती.

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतूक कोंडी आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी पुणे शहरातील ‘अ’ व ‘ब’ पोलीस स्टेशनमधील 1 अधिकारी व 8 अंमलदार तसेच ‘क’ दर्जाच्या पोलीस स्टेशनमधील 1 अधिकारी व 5 अंमलदार यांना तातडीने स्थानिक वाहतुक विभागाला संलग्न करण्यात आले आहे. या पोलीस अधिकारी आणि अंमलदारांच्या दैनंदिन ड्युटीबाबतचा निर्णय वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त घेणार आहेत.

 

याशिवाय या अधिकारी आणि पोलीस अंमलदार यांना वाहतुक व्यतिरिक्त पोलीस ठाण्याचे कर्तव्य देण्यात येवू नये असे स्पष्ट आदेश सह पोलीस आयुक्त संदीप कर्णीक यांनी दिले आहेत. याशिवाय ज्या ठिकाणी वाहतूकीचा गंभीर प्रश्न निर्माण होईल त्याठिकाणी स्थानिक पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि अंमलदार यांनी तात्काळ वाहतुक नियमन करावे, यासाठी वरिष्ठांच्या आदेशाची वाट पाहू नये असे देखील आदेशात नमूद केले आहे.

Advt.

दरम्यान, वाहतूक शाखेचा कारभार आर्थिक व सायबर गुन्हे विभागाचे पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके (DCP Bhagyashree Navtake) यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.
तर वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे (Traffic Branch DCP Rahul Srirame)
यांना वाहतूक शाखेच्या संदर्भातील कामकाज व कर्तव्याचा अहवाल
भाग्यश्री नवटके यांना सादर करण्याचेही आदेश पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिले आहेत.
भाग्यश्री नवटके या आर्थिक व सायबर गुन्हे विभागाचा कार्यभार सांभाळून वाहतूक शाखेच्या कामकाजावर देखरेख ठेवणार आहेत.

 

Web Title :- Pune CP Amitabh Gupta On Traffic Problem | Police Commissioner
Amitabh Gupta’s big decision to solve the traffic problem and dilemma!
300 attached to Police Traffic Branch, including officers

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा