Pune CP Amitesh Kumar | पुणे पोलिस आयुक्तालयातील 700 ते 800 पोलिस कर्मचार्‍यांच्या 15 फेब्रुवारीच्या आत बदल्या – पोलिस आयुक्त अमितेश कुमार

‘वजनदार’ अन् ‘गब्बर’ पोलिस कर्मचार्‍यांची ‘भंबेरी’ उडाली, अनेकजण हवालदिल

पुणे : नितीन पाटील – Pune CP Amitesh Kumar | पुणे पोलिस आयुक्तालयातील तब्बल 700 ते 800 पोलिसांच्या (पोलिस अंमलदार, पोलिस नाईक, पोलिस हवालदार, सहाय्यक पोलिस फौजदार) 15 फेब्रुवारीच्या आत अंतर्गत बदल्या करण्यात येणार असल्याचं पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी आज (मंगळवार) प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं आहे. कार्यकाळ पुर्ण झाल्यानंतर देखील त्याच पोलिस ठाण्यात आणि त्याच विभागात ठाण मांडून बसणार्‍या पोलिस कर्मचार्‍यांना पोलिस आयुक्तांनी चांगलाच दणका दिला आहे. त्यामुळे अनेक ‘गब्बर’ अन् ‘वजनदार’ पोलिस कर्मचार्‍यांची ‘भंबेरी’ उडाली आहे. (Pune Police News)


एकाच पोलिस स्टशेनमध्ये अथवा एकाच विभागात (गुन्हे शाखा, वाहतूक शाखा, विशेष शाखा, मुख्यालय) 5 वर्षापेक्षा अधिक काळ झालेल्यांची माहिती पोलिस आयुक्तांनी मागविली होती. माहितीचे संकलन युध्दपातळीवर सुरू असून येत्या 15 फेब्रुवारीच्या आतमध्ये तब्बल 700 ते 800 पोलिस कर्मचार्‍यांच्या अंतर्गत बदल्या करण्यात येणार असल्याचं पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट केलं आहे.

पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी कालच 35 पोलिस उपनिरीक्षक आणि 31 सहाय्यक पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या केल्या आहेत. अनेक दिवसांपासुन एकाच ठिकाणी सवता सुभा सांभाळणार्‍यांची आता धाबे दणाणली आहेत. कार्यकाळ पुर्ण झालेल्यांना 100 टक्के बदलण्यात येणार असल्याचं आयुक्तांनी स्पष्ट केल्यामुळे काही ‘गब्बर’ आणि ‘वजनदार’ पोलिस कर्मचारी हवालदिल झाले आहेत.

दरम्यान, 700 ते 800 पोलिस कर्मचार्‍यांच्या करण्यात येणार्‍या बदल्या या संबंधित पोलिस कर्मचार्‍यांना समोर बोलावून घेवून त्यांच्या आवाडीप्रमाणे (3 चॉईस पण त्या नियमात बसणार्‍या) करण्यात येणार आहेत. कोणाचीही गैरसोय होईल किंवा कोणालाही विनाकारण त्रास होईल अशा पध्दतीने काही एक केले जाणार नाही. मात्र, सर्वकाही नियमांनुसार करण्यात येणार असल्याचं देखील स्पष्ट करण्यात आलं आहे.
Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Fire News | महंमदवाडी येथील इमारतीच्या 11 व्या मजल्यावर भीषण आग

ACB Trap News | आदिवासी व्यक्तीकडून लाच स्वीकारताना लिपिक अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

PMC Recruitment Civil Engineer | पुणे महापालिका : सिव्हिल इंजिनियर पदाच्या 113 जागांसाठी 29 हजार 924 अर्ज

जुन्या भांडणाच्या कारणावरुन मोठा भाऊ, वहिनीच्या डोक्यात दगड घालून जीवे मारण्याचा प्रयत्न