Pune Crime | धक्कादायक ! पुण्यात दहावीत शिकणार्‍या मुलीचा मृतदेह आढळल्याने प्रचंड खळबळ, घात की अपघात?

पुणे : पोलीसानामा ऑनलाइन – Pune Crime | पुण्यातील खडकवासला (Khadakwasla) मधून धक्कादायक घटना समोर आली आहे. खडकवासला येथील चिंतामणी हाईट्स (Chintamani Heights) या इमारतीच्या व्हेंटीलेशन डक्टमध्ये (Ventilation Duct) एका 16 वर्षाच्या मुलीचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत सापडल्याने खळबळ उडाली आहे. संबंधित मुलीचं नाव हीना शब्बीर पठाण (Heena Shabbir Pathan) असं आहे. (Pune Crime)

पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या रहिवाशांना मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येत असल्याने त्यांनी खिडकीतून व्हेंटीलेशन डक्टमध्ये डोकावून पाहिले. त्यावेळी त्यांना मृतदेह दिसला तर या इमारतीत राहणार्‍यांनी हवेली पोलीस स्टेशनला (Haveli Police Station) माहिती दिली. काही वेळात तिथे पोलीस आणि अग्निशामक दलाचे (Pune Fire Brigade) जवान शुक्रवारी रात्री दाखल झाले.

दुसऱ्या दिवशी सकाळी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (PMRDA) नांदेड सिटी अग्निशमन केंद्राच्या जवानांनी दोरखंडाच्या सहाय्याने मृतदेह डक्टच्या बाहेर काढला. (Pune Crime)

मृतदेह सडलेला असल्यामुळे त्याची ओळख पटणं अशक्य होतं. मात्र पोलिसांनी रहिवाशांकडे चौकशी केली. त्यानंतर ओळख पटली आणि मुलगी त्याच इमारतीतील असल्याचं स्पष्ट झालं. हीनाच्या आईने 30 मार्चला पोलीस स्टेशनमध्ये अपहरण झाल्याची तक्रार दाखल केली होती. त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करताना हिनाचे सोलापूरमधील (Solapur) एका तरूणासोबत झालेले व्हाॅट्सअप चॅट (Whatsapp Chat) मिळालं आहे. त्या बाजूनेही तपास (Investigation) चालू आहे.

 

दरम्यान, हीना 10 वीत असल्याने तिचे बोर्डाचे (Maharashtra Board Exam) पेपर चालू होते. 30 मार्च आणि 1 एप्रिलला ती पेपरला हजर राहिली नाही. तिच्या भावाला शिक्षकांनी विचारणा केली त्यावेळी तिच्या पायाला दुखापत झाल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे आता पोलिसांनी वेगाने तपासाला सुरूवात केली आहे. पुढील तपास हवेली पोलिस करीत आहेत.

Web Title :- Pune Crime | 10th class girl student dead body found in khadakwasla suicide or murder Haveli Police Station


Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Urfi Javed Superhot Video | टॉप काढून उर्फीनं बांधला फक्त पट्टा, व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी केली ‘ही’ मागणी

NCP-BJP | भाजपला मोठा धक्का ! पश्चिम महाराष्ट्रातील ‘या’ बड्या नेत्याची कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीमध्ये ‘एन्ट्री’

Tina Dutta Superbold Look | टिना दत्तानं रिवालिंग ड्रेस घालून दिल्या बोल्ड पोज, फोटो पाहून चाहते झाले थक्क..

Tara Sutaria Red Hot Look | तारा सुतारियानं लाल रंगाची साडी नेसून सोशल मीडियावर केला कहर, फोटोनं
वाढवले चाहत्यांच्या हृदयाचे ठोके

Kareena Kapoor-Saif Ali Khan | वयाच्या 60 व्या वर्षी सैफ करतोय पुन्हा बाबा होण्याचा विचार? करीनानं दिली सक्त ताकीद; म्हणाली…