Pune Crime | पत्नीच्या त्रासाला कंटाळून पुण्यातील 24 वर्षीय लष्करी जवानाची आत्महत्या, पत्नी व सासरच्या लोकांवर FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पत्नीच्या (Wife) त्रासाला कंटाळून पुण्यातील एका लष्करी जवानाने (Military Soldier) आत्महत्या केल्याची (Commits Suicide) धक्कदायक घटना उघडकीस आली आहे. भारतीय सेना दलात नर्सिंग असिस्टंट (Nursing Assistant in Indian Army) असणाऱ्या तरुणाने पत्नीच्या व सासरच्या त्रासाला कंटाळून ही आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. गोरख नानाभाऊ शेलार Gorakh Nanabhau Shelar (वय-24 रा. वानवडी) असे आत्महत्या (Pune Crime) केलेल्या जवानाचे नाव असून गोरख यांनी आत्महत्या करण्यापूर्वी त्रासाबबतचा एक व्हिडीओ तयार करुन ठेवला आहे. तसेच सुसाइड नोट (Suicide Note) देखील लिहून ठेवली आहे. याप्रकरणी पोलिसांनी पत्नीसह इतरांवर गुन्हा दाखल केला आहे.

 

याप्रकरणी पत्नी अश्विनी युवराज पाटील (Ashwini Yuvraj Patil), सासरा युवराज पाटील (Father in Law Yuvraj Patil), सासू संगीता पाटील (Mother in Law Sangeeta Patil), मेहुणा योगेश पाटील Yogesh Patil (सर्व रा. नंदाने, ता. जि. धुळे Dhule) आणि मावस मेहुणी भाग्यश्री पाटील Bhagyashree Patil (रा. शहादा ता. शहादा, जि. नंदुरबार Nandurbar) यांच्यावर वानवडी पोलीस ठाण्यात (Wanwadi Police Station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. याबाबत केशव पाटील Keshav Patil (शेलार) यांनी फिर्याद दिली आहे. (Pune Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोरख हा भारतीय सेना दलात भरती नर्सींग असीस्टन्ट म्हणून नोकरीस होता. तो ट्रेनिंगसाठी काही दिवसांपुर्वी वानवडीतील ए.एफ.एम.सी. सैनिक आवास (A.F.M.C. Military Accommodation) येथे आला होता. दरम्यान त्याचा व अश्विनीचा गेल्याच वर्षी विवाह झाला होता. अश्विनी या गर्भवती (Pregnant) होत्या. दरम्यान, पत्नी आणि सासरचे मंडळी गोरखला त्रास देत होते. त्याला नोकरी घालवण्याची तसेच गर्भपात (Abortion) करु व तुझ्यावर आणि तुझ्या कुटुंबावर गुन्हा दाखल करु अशी धमकी देत होते. सोड चिठ्ठी दे आणि 15 लाख रुपये दे असे म्हणून त्याला त्रास देत होते.

 

या सततच्या त्रासाला वैतागून गोरख यांनी तीन दिवसांपूर्वी (6 फेब्रुवारी) ट्रेनिंगसेंटर परिसरात तो राहत
असलेल्या खोलीत गळफास (Hanging) लावून आतम्हत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी गोरख याने सुसाइड नोट लिहीली आहे.
तसेच, त्याने मोबाईलमध्ये पत्नी व सासरच्यांकडून होणाऱ्या त्रासाचा व्हिडीओ देखील शुट करुन ठेवला होता.
पोलिसांकडून हे सर्व जप्त करण्यात आले आहे.

 

Web Title :- Pune Crime | 24 year old soldier commits suicide in wanwadi of pune

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

IPS Krishna Prakash | पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांची ‘पोलीसनामा’च्या कार्यालयास सदिच्छा भेट

 

Pune Crime | दारु पिण्यास पैसे न दिल्याने टोळक्याने कोयत्याने वार करुन केला जीवे मारण्याचा प्रयत्न; सराईत गुंडाची जनता वसाहतीत दहशत?

 

Amol Palekar | प्रकृती खालवल्यानं अभिनेते अमोल पालेकर पुण्यातील रूग्णालयात दाखल