Pune Crime | 76 आरोपीकडून जप्त केले 3 कोटींचे अंमली पदार्थ; गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथक 1 ची कामगिरी

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन : (बासित शेख) – Pune Crime | अमली पदार्थाच्या वाहतूकीतील एक महत्वाचे ठिकाण म्हणून पुणे शहर ओळखले जात असून त्याला आळा घालण्याचा प्रयत्न शहर पोलीस दलाकडून (Pune City Police) केला जातो. (Pune Crime)

 

गेल्या १० महिन्यात अमली पदार्थ विरोधी पथक युनिट १ ने (Anti-Narcotics Cell, Pune) तब्बल ७६ आरोपींना पकडले असून त्यांच्याकडून २ कोटी ९२ लाख १२ हजार ४८० रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केले आहेत. (Pune Crime)

 

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) यांच्या नेतृत्वाखालील अमली पदार्थ विरोधी पथक १ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड (Senior Police Inspector Vinayak Gaikwad) यांच्या पथकाने १ जानेवारी ते ११ नोव्हेबर दरम्यान अंमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये एकूण ५५ केसेस दाखल केल्या आहेत. त्यात सर्वाधिक ३८ आरोपींकडून ६२ लाख ४० हजार ५४० रुपयांचा ३११ किलो गांजाचा समावेश आहे.

गांजा नंतर सर्वाधिक व्यसन हे मेफेड्रोन (एम डी) चे होत असल्याचे दिसून आले आहे.
२१ आरोपींकडून १ कोटी ७६ लाख ४८ हजार रुपयांचे एम डी जप्त करण्यात आले आहे.
६ आरोपींकडून ९ लाख ९१ हजार रुपयांचे अफिम ताब्यात घेण्यात आले आहे.
५ आरोपींकडून ३८ लाख ३४ हजार रुपयांचे कोकेन जप्त केले गेले आहे.
तर तिघांकडून ४ लाख ९२ हजार रुपयांची ३८ किलो अफुची बोंडे, दोदा पुरा जप्त केला गेला आहे.

 

हुक्का पार्लरवर बंदी घातली असली तरी मोठ्या प्रमाणावर हुक्का पार्लर सुरु असल्याचे अंमली पदार्थ विरोधी पथकाने केलेल्या कारवाईवरुन दिसून येते.

 

पथकाने ३७६ जणांवर या काळात कारवाई केली असून त्यांच्याकडून १० लाख ६० हजार रुपयांचे हुक्का फ्लेवर व सिगारेट जप्त केला.
तसेच ५ गुटखा केसेसमध्ये ४९ लाख ८० हजार रुपयांचा गुटखा जप्त केला आहे.

 

Web Title :- Pune Crime | 3 crore worth of drugs seized from 76 accused; Performance of Anti Narcotics Cell 1 Pune Police Crime Branch

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Maharashtra Police Inspector Suicide | पोलीस प्रशिक्षण केंद्रातील पोलीस निरीक्षकाची आत्महत्या; सुसाईड नोटमुळे प्रचंड खळबळ

ICC World Cup 2023 | भारत भूषवणार वर्ल्डकपचं यजमानपद, ‘या’ दहा शहरांत रंगणार सामना

Actress Sunny Leone | अभिनेत्री सनी लिओनीने ठोठावले केरळ उच्च न्यायालयाचे दरवाजे, जाणून घ्या नेमक काय आहे प्रकरण?