Pune Crime | 300 कोटीची क्रिप्टो करन्सी व पैशांच्या हव्यासापोटी अपहरण; खंडणी मागणाऱ्या मुख्य सुत्रधार पोलिसासह 8 जणांना अटक

आरोपींमध्ये पोलिस कर्मचारी दिलीप खंदारेचा समावेश, प्रचंड खळबळ

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन –  Pune Crime | 300 कोटी रुपयांच्या क्रिप्टो करन्सी (Cryptocurrency) आणि पैशांसाठी एका युवकाचे अपहरण (Kidnap) करुन खंडणी (Ransom) मागितल्याचा प्रकार समोर (Pune Crime) आला आहे. याप्रकरणी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात (Pimpri Chinchwad Police Commissionerate) कार्यरत असणाऱ्या पोलीस कर्मचारीच मुख्य सुत्रधार असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. खंडणी आणि अपहरण प्रकरणात वाकड पोलिसांनी (Wakad Police) गुन्ह्याचा मुख्य सुत्रधार पोलीस कर्मचाऱ्यासह 8 जणांना अटक केली आहे.

 

सुनिल राम शिंदे Sunil Ram Shinde (रा. खारदांड पश्चिम मुंबई), वसंत श्यामराव चव्हाण Vasant Shyamrao Chavan (रा. नालासोपारा पूर्व, मुंबई), फ्रान्सिस टिमोटी डिसूझा Francis Timothy D’Souza (रा. कल्याण (पश्चिम) जि. ठाणे), मयुर महेंद्र शिर्के Mayur Mahendra Shirke (रा. खार पश्चिम, मुंबई), प्रदिप काशिनाथ काटे Pradip Kashinath Kate (रा. दापोडी, पुणे), शिरीष चंद्रकांत खोत Shirish Chandrakant Khot (रा. उलवे, नवी मुंबई), संजय उर्फ निकी राजेश बंसल Sanjay alias Niki Rajesh Bansal (रा. उलवे, नवी मुंबई), दिलीप तुकाराम खंदारे Dilip Tukaram Khandare (रा. भोसरी मुळ रा. कोनाटी, ता. सिंदखेड राजा, जि. बुलढाणा) अशी अटक करण्यात आली आहे.
आरोपींना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
याप्रकरणी रफिख अल्लाउद्दीन सय्यद (वय-38) यांनी वाकड पोलीस ठाण्यात (Wakad Police Station) फिर्याद दिली आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी दिलीप खंदारे हा पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात कार्यरत आहे. (Pune Crime)

फिर्य़ादी यांचा मित्र विनय सुंदरराव नाईक Vinay Sundarrao Naik (रा. ताथवडे) याचे 7 ते 8 व्यक्तींनी हॉटेल समाधान येथून अपहरण केले होते.
प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी अपहरण झालेल्या व्यक्तीचा तपास सुरु करुन त्याच्या मोबाइल तसेच अपहरण झालेल्या ठिकाणचे सीसीटीव्ही कॅमेरे व तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा शोध सुरु केला.
दरम्यान पोलीस आपल्या मागावर असल्याचा सुगावा आरोपींना लागला आणि त्यांनी विनय नाईक याला वाकड परिसरात सोडून दिले.

 

अपहरण झालेल्या व्यक्तीकडे वाकड पोलिसांनी चौकशी केली असता बिट कॉईन (Bitcoin) व 8 लाख रुपये खंडणीची मागणी आरोपींनी केल्याची माहिती पोलिसांना दिली.
पोलिसांनी तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे सुनिल शिंदे, वसंत चव्हाण, फ्रान्सिस डिसूझा आणि मयुर शिर्के यांना ताब्यात घेऊन चौकशी केली.
आरोपींनी गुन्ह्याची कबुली देऊन हा गुन्हा प्रदिप काटे व दिलीप खंदारे यांच्या सांगण्यावरुन संजय उर्फ निकी राजेश बंसल, शिरीष चंद्रकांत खोत यांच्या मदतीने विनय नाईक याचे अपहरण केले.
अपहरण केल्यानंतर अलिबाग (Alibag) येथील एकांत हॉलीडे, कोपरवाडी मार्गे जलपाडा येथे ठांबून ठेऊन पैशांची मागणी केल्याची कबुली दिली.

आरोपींकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे तांत्रीक तपास करुन वाकड पोलिसांच्या पथकाने प्रदिप काटे, संजय बंसल, शिरीष खोत यांना हिंजवडी येथील एका हॉटेलमधून ताब्यात घेतले.
त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता दिलीप खंदारे या पोलिसानेच गुन्ह्याचे प्लॅनिंग केल्याचे आरोपींनी सांगितले.
दरम्यान दिलीप खंदारे हा भोसरी (Bhosari) येथे येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
पोलिसांनी त्याला भोसरी परिसरातून ताब्यात घेतले

 

कोण आहे दिलीप खंदारे ?
दिलीप खंदारे हा पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात पोलीस शिपाई पदावर कार्यरत असून सध्या तो गैरहजर असल्याची माहिती समोर आली.
तो पोलीस दलात कार्यरत असताना सेवाअंतर्गत ऑफिस ऑटोमेशन (Office Automation), सायबर गुन्हे प्रणाली (Cyber Crime System), एडव्हान्स सायबर क्राईम इन्व्हेस्टीगेशन टेक्नॉलॉजी (Advanced Cyber Crime Investigation Technology),
बेसीक ऑफ हार्डवेअर अँड नेटवर्क इंन्फॉरमेशन (Basic of Hardware and Network Information),
मोबाईल फॉरेन्सीक (Mobile Forensics) असे कोर्स त्याने केले आहे.

पुण्यातील सायबर क्राईम विभागात (Pune Cyber Police Crime Department) नेमणुकीस असताना त्याला ताथवडे येथील विनय नाईक याच्याकडे 300 कोटी रुपयांची बिट कॉईन ही क्रिप्टो करन्सी असल्याची माहिती मिळाली होती.
त्यामुळे त्याने विनय नाईक याचे अपहरण केले तर खुप पैसे व क्रिप्टो करन्सी मिळवण्याचा प्लान केला.

असे केले अपहरण
विनय नाईक याचे अपहरण करण्यासाठी दिलीप खंदारे याने साथिदार सुनील शिंदे, वसंत चव्हाण, फ्रान्सिस डिसूझा, मयुर शिर्के, प्रदिप काटे, शिरीष खोत संजय बंसल यांच्या सोबत वडगाव मावळ (Wadgaon Maval) येथील हॉटेल शितलमध्ये विनय नाईकच्या अपहरणाचा कट रचला.
त्याप्रमाणे विनय याला ताथवडे येथील समाधान हॉटेलमध्ये बोलावून वॅगनआर (एमएच 02 ईयू 1952) कारमधून अपहरण केले.
तर इतर आरोपी इनोव्हा कारमधून आलिबाग येथे आले.
अलिबाग येथे आल्यानंतर आरोपींनी विनय याच्याकडे पैशांची मागणी केली.
मात्र पोलीस आपल्या मागावर असल्याची माहिती खंदारे याला मिळाल्यानंतर आरोपींनी विनय नाईक याला वाकड परिसरात सोडून दिले.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश तोरगल करीत आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश (CP Krishna Prakash), अपर पोलीस आयुक्त संजय शिंदे (Addl CP Sanjay Shinde),
पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 आनंद भोईटे (DCP Anand Bhoite), सहायक पोलीस आयुक्त श्रीकांत डिसले (ACP Shrikant Disley) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर (Senior Police Inspector Dr. Vivek Mugalikar),
पोलीस निरीक्षक गुन्हे संतोष पाटील (Police Inspector Santosh Patil),
पोलीस निरीक्षक गुन्हे 2 रामचंद्र घाडगे सहायक पोलीस निरीक्षक अभिजीत जाधव (API Abhijeet Jadhav), पोलीस उपनिरीक्षक गणेश तोरगल (PSI Ganesh Torgal), पोलीस अंमलदार बिभिषण कन्हेरकर, बाबाजान इनामदार,
राजेंद्र काळे, बापूसाहेब धुमाळ, विक्रम कुदळ, विजय गंभीरे, दिपक साबळे, वंदु गिरे, अतिश जाधव, प्रमोद कदम,
अतिक शेख, प्रशांत गिलबीले, विक्रांत चव्हाण, कल्पेश पाटील, कौतेंय खराडे, अजय फल्ले,
महिला पोलीस शिपाई नुतन कोंडे यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Pune Crime | 300 crore cryptocurrency and money laundering 8 arrested for ransom including police Dilip Tukaram Khandare

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा