Pune Crime | 55 वर्षाच्या सुनेचा 80 वर्षाच्या सासर्‍यांकडून विनयभंग; प्रभात रोडवरील सुखवस्तू घरातील कुटुंबामधील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | फौजदारी व कौटुंबिक न्यायालयात (Family Court) केसेस सुरु असताना सासरी आलेल्या ५५ वर्षाच्या सुनेचा ८० वर्षाच्या सासर्‍यांनी विनयभंग (Molestation Case) केल्याचा प्रकार प्रभात रोडवरील (Prabhat Road, Pune) बंगल्यात शुक्रवारी घडला. (Pune Crime)

 

याप्रकरणी पिंपळे सौदागर (Pimple Saudagar) येथे राहणाऱ्या ५५ वर्षाच्या महिलेने डेक्कन पोलीस ठाण्यात (Deccan Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ८२/२२) दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी ८० वर्षाच्या सासर्‍यांवर विनयभंगाचा गुन्हा (FIR) दाखल केला आहे.

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे सासर प्रभात रोडला आहे. त्या पतीपासून वेगळ्या पिंपळे सौदागर येथे राहतात. त्यांच्यात फौजदारी न्यायालय व कौटुंबिक न्यायालयात ३ केसेस सुरु आहेत. त्या शुक्रवारी दुपारी सासरी नांदण्यास राहण्यासाठी आणि पोटगी घेण्यासाठी आल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या ८० वर्षाच्या सासर्‍यांनी अडवून अश्लिल शिवीगाळ करुन त्यांचा विनयभंग केला, अशी फिर्याद दिल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

 

Web Title :- Pune Crime | 55 year old daughter in law molested by 80 year old father in law; A domestic incident at a luxury house on Prabhat Road pune crime news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Maharashtra Cabinet Meeting | शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय ! आता औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबादचं धाराशिव नामांतर

 

DA Arrear | 18 महिन्यापासून अडकलेल्या महागाई भत्त्याच्या एरियरचे काय होणार ? केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी आली मोठी अपडेट

 

Chasakman Dam | चासकमान धरणातून विसर्ग सुरू, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा